Akola Crime News Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात तक्रारदारच निघाले गुन्हेगार; स्वतःलाच लुटल्याचा केला बनाव

या तक्रारीचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लूटमारीचा बनाव अवघ्या काही तासात उघड करून तक्रार खोटी असल्याचे उघडकीस आणले.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - स्वतःला चाकु दाखवून लुटल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देणाऱ्या तक्रारदारालाच पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. लुटल्याचा बनाव करून खोटी तक्रार आरोपीने पोलीस ठाण्यात दिली होती. स्वतः जवळील रक्कम मित्राकडे सोपवून पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लूटमारीचा बनाव अवघ्या काही तासात उघड करून तक्रार खोटी असल्याचे उघडकीस आणले. सागर काळे आणि रोहित सांगळे या दोघांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, ते दोघे अकोला येथे सहारा टेडर्स करिता एका नामांकित कंपनीच्या वस्तू अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात मालवाहू वाहनातून विक्री करतात.

हे देखील पाहा -

त्यातून मिळालेली रोख रक्कम मालक समीर अंसारी यांच्याकडे दररोज जमा करतात. नेहमी प्रमाणे पातुरनंदापूर येथून माल घेऊन, विक्री करून रात्रीच्या सुमारास कोळंबीकडे येत असताना एका मोटारसायकलवरील तीन जणांनी त्यांच्या गाडीच्या काचेवर दगड मारून गाडी अडवली व चाकूचा धाक दाखवून बॅग हिसकावून घेतले. त्यात दिवसभर माल विक्रीतून जमा केलेले ४५ हजार ५०० रुपये व दोन मोबाइल लुटले असल्याची तक्रारीत म्हटलं होते. या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

दरम्यान, स्थानिक गुन्हे पथकाने याचा तपास केल्यानंतर तक्रारदारांना कसून विचारपूस केली असताना लुटमारीचे प्रकरण बनावट असल्याचा प्रकार उघडकीस आला. तक्रारदार सागर सुरेश काळे व रोहित हर्षल सांगळे या दोघांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी लुटमार झाल्याच्या घटनेचा बनाव रचला. माल विक्रीतून गोळा झालेली रोख रक्कम व त्यांचे मोबाइल घटनास्थळावर मित्र निखीलेश विजय भोजने यास बोलावून त्याचेकडे दिले. त्यानंतर पोलीस स्टेशनला जावून खोटी तक्रार दिली. निखीलेश विजय भोजने या विद्यार्थ्यांकडून गुन्ह्यातील रोख रक्कम ४४ हजार १९० रुपये व दोन मोबाइल जप्त केले. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलसह एकूण एक लाख ४७ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Symptoms On Skin: चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स दिसतायेत? असू शकतं लिव्हर बिघडल्याच लक्षण, वेळीच व्हा सावध

Rashmika-Vijay Wedding: तारीख ठरली! रश्मिका आणि विजयच्या लग्नाचा बार उडणार; उदयपूरमध्ये होणार शाही विवाह

Vande Bharat Express : ४ नव्या वंदे भारत धावणार, कोणता आहे मार्ग? पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Leopard Terror in AhilyaNagar: जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत; बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

SCROLL FOR NEXT