Akola Crime News SaamTv
महाराष्ट्र

Akola Crime : अकोला हादरलं! 24 तासांत दुसरी हत्या

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News : अकोला (Akola) शहरात 24 तासांत दोन हत्येच्या घटना समोर आल्याने शहर हादरले आहे. शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर काल पुन्हा अकोल्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोल्यातील भगत वाडी परिसरात ही हत्या करण्यात आली आहे. अमीन खान असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Akola Crime Latest News)

धारदार शस्त्राने अमीन खान यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर हल्लेखोर फरार. अमीन खान यांच्या हत्येमागील नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान 24 तासात अकोला शहरात दुसरी हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. (Akola News Today)

१ दिवसापूर्वी विशाल कपले या शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेचा तपास सुरू असताना काल पून्हा एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस कमी पडत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे नव्याने रुजू झाल्यानंतर आठवडाभरात तीन खुनाच्या घटना आणि एक प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत असून आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT