Akola Muncipal Corporation Election 2025 2026 Saam Tv
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना, भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता, वाचा

Akola Muncipal Corporation Election 2025 2026 News : अकोल्यात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. आज सकाळी ९ नंतर उच्चस्तरीय बैठकीत नव्या फॉर्म्युल्यावर निर्णय होत असल्याचे पक्षांनी सांगितले. महायुतीत पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रात पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपावर तणाव

  • पुण्यात शिवसेना आणि भाजपात जागा वाटपामुळे नाराजीचे वातावरण

  • अकोलात महायुतीतील पक्षांत आरोप-प्रत्यारोप

  • आज सकाळी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक

अक्षय गवळी, अकोला

महाराष्ट्रात सध्या पालिका निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून महायुतीत जागा वाटपावरून तणाव पाहायला मिळत आहे. पुण्यात शिवसेनेला कमी जागा मिळाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. तर दुसरीकडे भाजपाला केडीएमसी निवडणुकीत कमी जागा मिळाल्याने भाजप पक्षात नाराजी पाहायला मिळाली आहे. तसेच आता अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा चर्चांच्या अनेक फेऱ्यांनंतरही सुटता सुटत नाही. भाजप पुरेशा जागा देत नसल्याचा आरोप महायुतीतील दोन्ही पक्षांनी केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सलग दुसऱ्या दिवशी भाजप, पक्षातील स्थानिक नेते आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. तर याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी महायुतीत ८० पैकी ३५ जागांची मागणी केली आहे.

दरम्यान, भाजपकडून सन्मान ठेवला जात नसल्याचा आरोप करीत मिटकरींनी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपिकिशन बाजोरियांशी जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत बाजोरियांच्या निवासस्थानी ही चर्चा सुरू होती. आता सकाळी या चर्चेत शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड सहभागी होणार आहेत.

आज सकाळी ९ नंतर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे. याआधी अकोला महापालिकासाठी या तिन्ही पक्षांत ८० जागांचा फॉर्म्युल्यात ५५ भाजप, १५ शिंदेसेना आणि १० अजित पवारांची राष्ट्रवादी असा भाजपचा प्रस्ताव होता.

मात्र, यावरून शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांत असंतोष होत आहे. सकाळच्या बैठकीनंतर दुपारपर्यंत महायुतीचं भविष्य ठरणार असल्याचं शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. सन्मानपूर्वक जागा नसेल तर जिथे सन्मान तिथेचं आम्ही जाऊ, असे स्पष्टचं सेंकत नेत्यांनी दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT