Akola Muncipal Election 2025 2026 Seat Sharing Saam Tv
महाराष्ट्र

Akola : महायुतीत खोडा घालण्याचा प्रयत्न नक्की कोण करतंय? भाजप नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Akola Muncipal Election 2025-26 Seat Sharing : अकोला महापालिका निवडणुकीतील ८० जागांच्या वाटपावरून महायुतीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपच्या ५५-१५-१० फॉर्म्युल्याला शिंदे शिवसेना व राष्ट्रवादीतील एका गटाचा विरोध आहे.

Alisha Khedekar

  • महायुतीतील तीन पक्षांत दोन-दोन गटांचे वेगवेगळे मतप्रवाह

  • भाजपचा ५५ - १५- १० फॉर्म्युला पक्षांना अमान्य

  • मंत्री स्तरावर आज अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न

  • दुपारपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित

अक्षय गवळी, अकोला

अकोला महापालिकेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली खरी, मात्र महायुतीत खोडा घालण्याचा प्रयत्न आजी-माजी आमदारकडून होत असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. महायुती न होऊ देण्यामागे काही नेते जबाबदार असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेचा एक गट भाजपच्या प्रस्तावाला तयार दर्शवितो आहे. मात्र, दुसरा गटाचा मोठा विरोध आहे.

दरम्यान, अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा चर्चा अनेक फेऱ्यांनंतरही सुटत नाही आहे. राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी महायुतीत ८० पैकी २५ पेक्षा अधिक जागांची मागणी केली आहे. सन्मान नसेल तर वेगळा विचार केला जाईल. असा स्पष्टचं इशारा दिला आहे.

सन्मानपूर्वक जागा द्या, असा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून भाजपपुढे ठेवण्यात आला आहे. आता या चर्चेत आज शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड, आणि राष्ट्रवादीकडून मंत्री इंद्रनील नाईक सहभागी होणार आहेत. आज सकाळी ९ नंतर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपाच्या नव्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे

याआधी अकोला महापालिकासाठी या तिन्ही पक्षांत ८० जागांचा फॉर्म्युल्यात ५५ भाजप, १५ शिंदेसेना आणि १० अजित पवारांची राष्ट्रवादी असा भाजपचा प्रस्ताव होता. मात्र, यावरून शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांत असंतोष निर्माण झाला आहे. आज सकाळच्या बैठकीनंतर दुपारपर्यंत महायुतीचं भविष्य ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ; तुळजापुरात भाविकांची मांदियाळी

Mint-Lemon Juice For Liver Health: लिव्हरच्या आरोग्यासाठी बेस्ट ड्रिंक, आठवड्यातून 2 वेळा प्यायल्यास होईल फायदा

Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

भाजप आमदारालाच गंडा घालण्याचा प्रयत्न! SBI मध्ये नोकरीचं आमिष, नेमकं प्रकरण काय?

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

SCROLL FOR NEXT