अकोल्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन Saam Tv
महाराष्ट्र

अकोल्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोला - अकोला प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या मुल व मुलींचे वसतिगृह सुरू करण्याबाबत व शैक्षणिक सत्रामधील पंडित दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत तत्काळ निधी देण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हे देखील पहा -

राज्यभर महाविद्यालय सुरू झाली आहेत. अकोल्यामध्ये ही महाविद्यालय सुरू करण्यात आली आहे. इतर मागासवर्गीय शासकीय वस्तीगृह, जवाहर नवोदय विद्यालयातील केंद्र सरकार शिक्षा मंत्रालयातील शासकीय वसतिगृह सुरू झाली आहे. आदिवासी वस्तीगृह आतापर्यंत सुरू झाले नाहीत.

ही वस्तीगृह व शैक्षणिक वर्ष 2020 ते 2021 मधील आतापर्यंत पंडित दीनदयाळ योजना अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नाही. या प्रकल्प कार्यालयाला निवेदन दिले तरी पण कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व वसतिगृह तसेच दीनदयाल योजनेचा लाभ देण्यात याव्यात या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT