Akola Accident News  Saam tv
महाराष्ट्र

Akola Accident : कामावरून घरी जाताना काळाचा घाला; रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Akola Accident Latest News : अकोल्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातुर रस्त्यावर अपघात झाल्याची घटना घडली. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

अक्षय गवळी, अकोला

Akola Accident News :

अकोल्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावर अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या अपघाताने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात तिहेरी अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावरील वाडेगावजवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघात कसा झाला?

बाळापुरात राहणारे सर्वजण दुचाकीवरून दररोजचं काम संपवून बाळापूरकडे जात होते. अकोल्यात बाळापूर पातूर रस्त्यावर आल्यानंतर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वारासहित सर्व जण खाली कोसळले. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले.

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही अपघाताची घटना आज सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर पोलीस सध्या वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. शेख सादीक शेख रज्जाक (वय 45), शेख खालीद शेख रज्जाक (वय 40), शेख माजीद शेख सादीक (वय 24) असे तीनही अपघातातील मृतकांचे नावे आहेत. अपघातामधील हे तिन्ही जण बाळापूर येथील राहणारे होते.

अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. स्थानिकांची मोठी गर्दी झाली. या घटनेनंतर कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अपघात प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT