Akola Accident Saam Tv
महाराष्ट्र

Akola Accident: रॉग साईंडनं आलेल्या ट्रकनं कारला चिरडलं; कारचा चुराडा, जवानाचा मृत्यू

Akola Accident: अकोला जिल्ह्यातील पातुर-अकोला रस्त्यावरील चिखलगाव गावाजवळ आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोला: अकोला पातुर रस्त्यावर ट्रक आणि कारचा आज भीषण अपघात झालाय. या अपघात ३ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे. दरम्यान एका सैनिकाचा मृत्यू झालाय. विशाल गुलाब तायडे, असं या सैनिक जवानाचे नाव आहे. अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला असून कारचा अक्षरश: चुराडा झालाय. या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

बीडच्या नित्रुड येथे तिहेरी अपघातात; १ जण ठार

बीडच्या माजलगाव तेलगाव महामार्गावरील नित्रुड येथे तिहेरी अपघात झालाय. यामध्ये १ जण ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना घडलीय. तेलगावकडून माजलगावकडे जाणाऱ्या बैलगाडी आणि दुचाकीला ४ चाकी वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील रतन कांबळे वय ४५ यांना डोक्याला मार लागल्याने हे जागीच ठार झाले आहेत.

तर त्यांच्यासोबत असलेल्या मनीषा सुरेश वाघमारे वय ४०,लक्ष्मी लखन कदम वय ३० कार्तिक लखन कदम वय हे गंभीर जखमी झाले आहेत. तर बैलगाडीला धडक बसल्याने दोन्ही बैलाचे पाय मोडलेत. दरम्यान याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT