अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना संसर्ग कमी झाल्यावरतीच! डॉ.माधव सावरगावे
महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना संसर्ग कमी झाल्यावरतीच!

साहित्य महामंडळाची व स्वागतमंडळाची आज औरंगाबाद येथे एक बैठक पार पडली यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना संसर्ग कमी झाल्यावरतीच घेण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ मात्र आता तारखा सांगण अशक्य असलेतरी हे संमेलन फार पुढे जाणार नाही याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल तसेच स्वागताध्यक्ष नामदार छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून साहित्य संमेलन लवकरात लवकर घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन आज साहित्य संमेलनाच्या स्वागतमंडळाचे प्रमुख कार्यवाह व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आणि स्वागतमंडळाचे समितीप्रमुख विश्वास ठाकूर, स्वागतमंडळाचे कार्यवाह डॉ. शंकर बो-हाडे, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, सदस्य विनायक रानडे हे संमेलनाबबत व कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांशी चर्चा करण्यासाठी साहित्य महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयात आले होते.

या भेटीत त्यांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील,Kautikrao Thale Patil कार्यवाह डॉ. दादा गोरे आणि कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्याशी संमेलनाच्या संबंधित प्रश्नांवर चर्चा केली त्यावेळी हि भूमिका मांडण्यात आली.Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan after the corona infection subsided

या चर्चेमध्ये विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने 94 वे साहित्य संमेलन मार्च महिन्यात ठरले होते मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने ते स्थगित केले आहे रद्द केलेल नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी अध्यक्षांनी दिले. तसेच लोकांच्या इच्छेचा मान राखून साहित्य संमेलन व्हायलाच हवे ही आमची भूमिका आहे, मात्र कोरोना संसर्ग कमी होत नाही आणि राज्य सरकार परवानगी देत नाही तोंपर्यंत संमेलन होणार नाही असा निर्णयसुध्दा या बैठकीत झाला.

संमेलन लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न

कोरोनाचा प्रभावCorona effect कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ मात्र आता तारखा सांगण अशक्य असलेतरी हे संमेलन फार पुढे जाणार नाही याची दक्षता स्वागतमंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल तसेच स्वागताध्यक्ष नामदार छगन भुजबळChhagan Bhujbal यांच्याशी चर्चा करून साहित्य संमेलन लवकरात लवकर घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासनही यावेळी देण्यात आलं.

ऑनलाईन संमेलन नाहीच

ऑनलाईन संमेलनOnlineConvention घेणे स्वागतमंडळाच्या विचाराधीन नाही तसेच नाशिककरांना हे साहित्य संमेलन घ्यायचे असल्याचही ते यावेळी म्हणाले संमेलन नाशिककरांसाठी घ्यावयाचे असल्याने त्याचा लाभ साहित्य रसिकांना घेता येईल अशी साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचीही भूमिका आहे. मात्र संमेलन जेव्हा घेऊ तेव्हा ते उत्तमच घेऊ याचाही पुनरुच्चार नाशिकच्या प्रतिनिधींनी केला.

साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदीBook purchase व प्रकशक विक्रेत्यांना पुस्तक विक्रिचा लाभ घेता यावा तसेच लेखक-वाचकांच्या गाठीभेटी व्हाव्यात अशी साहित्य महामंडळाची व स्वागतमंडळाची निर्विवाद भूमिका आहे. त्यादृष्टीने हे संमेलन नेहमीप्रमाणेच व्हावे असा साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागतमंडळाचाही प्रयत्न असल्याची भूमिक यावेळी मांडण्यात आली.तसेच संमेलन लोकांसाठी आहे आणि तो आनंद सर्व लोकांना मिळायला हवा ही आमची भूमिका आहे असंही या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलं.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

SCROLL FOR NEXT