अजित पवार 

 

Saam Tv

महाराष्ट्र

अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी भर पावसात पोलीस पुढे सरसावले. मात्र गार्ड ऑफ ऑनर नाकारून त्यांनी पोलिसांना भिजू नका असं सांगितलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभूषण लिमये

उस्मानाबाद : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे आज मराठवाड्यातील बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. कोरोना रुग्णांचे प्रमाण या दोन्ही जिल्ह्यात अजूनही आढळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची परिस्थिती आणि खरिपाच्या पेरणीबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार दोन्ही जिल्ह्याचा दौरा करत आहेत.

यावेळी उस्मानाबाद शहर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु होता. अशावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवारांच्या वाहनांचा ताफा पोहोचला असता त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. मात्र पावसात भिजणाऱ्या पोलिसांनी पाहून अजितदादांना गार्ड ऑफ ऑनर नाकारला आणि पोलिसांना भिजू नका असं सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे येत असल्यामुळे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तयारी केली होती. मात्र, अजित पवार आण राजेश टोपे दाखल झाले त्यावेळी जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. अशावेळी पोलीस कर्मचारी मंत्रिमहोदयांना गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी पुढे सरसावले.

अजित पवार यांनी गाडीतून उतरताच पोलिसांना भिजू नका असं सांगत गार्ड ऑफ ऑनर नाकारला. अजित पवार हे आपल्या धडाडीची कार्यशैली आणि रोखठोक बोलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आज उस्मानाबादमध्ये अजित पवारांनी दाखवलेली माणुसकीही चर्चेचा विषय ठरली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT