Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: पुन्हा मविआचे सरकार येणार अन् अजित पवार मुख्यमंत्री होणार; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

"सुप्रीम कोर्टाचे निर्णयानंतर हे सरकार कोसळणार, एकनाथ शिंदे हे जास्त दिवस मुख्यमंत्री नाहीत"

Shivani Tichkule

अभिजीत देशमुख

Political News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून राजकीय नेत्यांकडून वेगवेगळी विधानं केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागलेले बॅनर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Latest Marathi News)

दुसरीकडे विद्यमान शिंदे फडणवीस सरकारचे न्यायालयाच्या निकालानंतर काय होणार याबाबत देखील नाना तर्क वितर्क लढवले जात आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील मोठं विधान केल आहे.

कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी अमोल मीटकरी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार अमोल मीटकरी यांनी सरकार कोसळणार आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास बोलून दाखवला. (Politcal News)

पुढे बोलताना, सुप्रीम कोर्टाचे निर्णयानंतर हे सरकार कोसळणार, एकनाथ शिंदे हे जास्त दिवस मुख्यमंत्री नाहीत. मी अंदाज बांधत नाही मात्र संविधानाचा जितका अभ्यास केला त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाला संविधानाच्या कक्षेच्या बाहेर जाता येउ शकत नाही, त्यामुळे हे सरकार अपात्र होवून महाविकास आघाडीचे सरकार येणार.

अजितदादा असे नेते की त्यांच्या फोन बंद असला तरी अनेक लोकांचं पित्त खवळतं. त्यांचा फोन बंद असल्याने त्याच्यावर चर्चा होते हाच त्यांचा मोठेपणा आहे. दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मी आज ही सांगतो की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अजित दादा पवार असतील असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT