Amol Kolhe speaks about Ajit Pawar’s alleged plan to send Chhagan Bhujbal to Rajya Sabha, reigniting political debate in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते, अजित पवारांची होती इच्छा; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

Ajit Pawar Statement On Chhagan Bhujbal Rajya Sabha Seat: अमोल कोल्हे यांनी राज्यसभेच्या नियुक्तीवर मोठा गौप्यस्फोट करत अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा गौप्यस्फोट करत राज्यसभेच्या चर्चांबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी ओघातच छगन भुजबळ हे आगामी काळात राज्यसभेवर जाऊ शकतात, असं सुतोवाच केलं होतं.कोल्हे म्हणाले की, भुजबळ साहेबांचा त्रागा समजू शकतो. जातनिहाय जनगणना होत असताना भुजबळ यांच्यासारख्या वरिष्ठ आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्याची संसदेत उपस्थिती महत्त्वाची आहे.

ते पुढे म्हणाले, अजित दादांनी एकदा चर्चेदरम्यान भुजबळ साहेबांनी राज्यसभेत जावं अशी इच्छा असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता न जाता कोट्यवधी रुपये घेऊन निवडणूक रणनिती आखणाऱ्या व्यक्तीचं नाव राज्यसभेसाठी पुढे येत असेल, तर भुजबळ साहेब अस्वस्थ होणं साहजिक आहे. अजित दादांनी भुजबळ साहेबांना चर्चेत का घेतलं नाही, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. तसेच भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांमध्ये आलेल्या एका व्हिडिओचा उल्लेख करत, त्यातील सुतोवाच तपासण्याचं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राज्यसभा नियुक्ती आणि अंतर्गत मतभेदांबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

छगन भुजबळ ही नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक ही होते. मात्र महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटल्याने हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच आपण निवडणूक लढवावी अशी इच्छा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची ही होती असे ही भुजबळ यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यावेळी भुजबळ नाराजीही होते. राज्यसभेवर पाठवले जाईल असे भुजबळ यांना अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आल्याने भुजबळ यांनी पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशातच आज पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी या विषयावर भाष्य करत राजकीय चर्चाना उधाण आणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना, भीषण अपघातात बापलेकाचा करूण अंत, मायलेक गंभीर जखमी

Shocking : माहेरी आलेल्या महिलेच्या २१ महिन्यांच्या बाळाची मावशीकडून हत्या; नेमकं काय घडलं?

सत्तासंघर्षावरून भाजप फुटली, काँग्रेसकडून महायुतीसह ठाकरे गटाचा गेम; भिवंडीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर महात्मा फुले दांपत्यांचा अवमान; विंश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ajit Pawar Death: अजित पवार अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट? रोहित पवार दिल्लीत पत्रकार परिषदेत कोणती नवी माहिती देणार?

SCROLL FOR NEXT