Ajit Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : महायुतीत अजित पवार नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ajit Pawar Latest news : महायुतीत अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. मागील दोन दिवसांपासून अजित पवारांनी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेणेही टाळले आहे. त्यामुळे पडद्यामागे काय सुरु आहे, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही

मुंबई : मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपुरातील मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.अजित पवारांच्या नाराजीची चर्चा विधानभवनात सुरु आहे. अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपला २०, शिंदे गटाला १२ तर अजित पवार गटाला ९ मंत्रिमंधे मिळाले आहेत. महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता खातेवाटप होणे बाकी आहे. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष खातेवाटपाकडे लागले आहेत. खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखाते मिळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मागील दोन दिवसांपासून अजित पवारांना अर्थखाते मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

खातेवाटपात अजित पवारांना अर्थखाते मिळणार नसल्याची विधानभवनात कुजबुज सुरु झाली आहे. खातेवाटपात गृह, अर्थ आणि नगरविकास खाते भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत होणाऱ्या खातेवाटपात अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळणार नसल्याची चर्चा आहे. महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता अंतर्गत नाराजी समोर आली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदेंना नगरविकास खात दिलं जाणार नाही, अशी चर्चा झाली. आता राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार? हे पाहणे महत्वाचं आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 'मी मागील २ दिवसांपासून अजित पवारांना भेटण्याचा प्रयत्न करतोय. पण भेट झालेली नाही. छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना समज द्यावी, अजित पवारांच्या फोटोला जोडे मारल्याची ही गोष्ट निषेधार्थ आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. अजित पवारांना जातीयवादी म्हटलं गेलं. आमच्याकडे कोणाचीही जात विचारली जात नाही. छगन भुजबळ हे पक्ष सोडणार नाहीत'.

अनिल पाटील महत्वाचं बोलले

आमदार अनिल पाटील म्हणाले की, 'मी अजित पवार यांच्या भेटीसाठी गेलो होतो. मात्र, अजित पवारांची भेट होऊ शकली नाही. सध्या नाराजी, खातेवाटप, प्रतोद निवडणे या सगळ्या घडामोडी चालू आहेत. त्यामुळे ते कदाचित संपर्कात नसतील. मी यापुढे प्रतोद नसणार आहे. संध्याकाळपर्यंत कदाचित याबाबत माहिती मिळू शकते.

'आमच्याकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. छगन भुजबळ समर्थकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारणे अशा पद्धतीचे आंदोलन करणे योग्य नाही. पक्षाने मलाही गरज नसताना मंत्रिपद दिलं होतं. त्यामुळे आता पक्षाला जे योग्य वाटलं असेल, ते त्यांनी केलं असेल, असे अनिल पाटील पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT