Ajit Pawar 
महाराष्ट्र

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Ajit Pawar Slams Mla: अजित पवार यांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच सुनावलंय. बुलढाण्यात एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

Bharat Jadhav

संजय जाधव, साम प्रतिनिधी

वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्या, मुख्यमंत्र्यांना व घटक पक्षांना अडचणीत आणू नये, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले. आमदार संजय गायकवाड यांनी नुकतेच राहुल गांधी यांची जीभ छाटण्याच्यासाठी 11 लाखांचे बक्षीस जाहीर करण्याचे बेताल वक्तव्य केले होते. यामुळे मोठा वाद उफाळून आला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी वाचाळगिरी करणाऱ्यांना सुनावलंय.

अजित पवार व उप मुख्यमंत्री फडणवीस आज मुख्यमंत्र्यांसोबत बुलढाण्यात लाडकी बहीण कार्यक्रमासह बुलडाणा शहरातील पुतळ्यांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. याप्रसंगी दाखल झाले होते. दरम्यान या कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपापली मते मांडण्याचा विचार व मत मांडणाचा अधिकार आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार आपल्याला दिला आहे. कुठल्याही सत्ताधारी, विरोधी व कुठल्याही पक्ष असो वाचाळवीरांनी शाहू फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मर्यादा पाळाव्यात. कुठेही वेळे वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना किंवा घटक पक्षांना अडचणीत आणू नये, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

आमदार गायकवाड यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेनंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुतीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या विधानाबद्दल अजित पवारांनी आमदारांना खडेबोल सुनावलेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वाचाळवीर म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच संजय गायकवाड यांचे नाव न घेता कान टोचले. या कार्यक्रमात स्वत: आमदार संजय गायकवाडहेही उपस्थित होते.

राहुल गांधींना अजित पवारांचा सवाल

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानावरही अजित पवार आपलं मांडलं. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला, आदिवासी, आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षण दिले. तेच आरक्षण काढून घेण्याची भाषा तु्म्ही करता. ही देशातील पद्धत आहे का?", असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

माथेफिरूचा थरार, भीषण गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT