Ajit Pawar News
Ajit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय; अजित पवार असं का म्हणाले?

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. २०२४ मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी बावनकुळेंना खोचक टोला लगावला आहे. (Latest Marathi News)

बावनकुळेंच्या आव्हानानंतर मी घाबरलो, मला झोप येत नाही, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या आव्हानानंतर मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय, असा खोचक टोलाही अजित पवारांनी बानकुळेंना लगावला आहे. ते नागपुरात बोलत होते. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनात बोलताना सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली होती. काही महिन्यांआधी बावनकुळे यांनी बारामतीतलं राष्ट्रवादीतलं घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता पण मनात आणलं तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा अजितदादांनी बावनकुळे यांना दिला होता.  (Maharashtra Political News)

यावर उत्तर देताना 'खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे.माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल', असं विधान बानकुळेंनी केलं होतं.

दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, अजित पवारांनी उपरोधिक टोला लगावला. 'अरे बापरे, मला बावनकुळे यांच्या विधानानंतर झोपच येईना हो..हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं. राजकीय संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये असा अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्यांना', असं अजित पवार म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT