Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का? अजित पवारांचे शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Supreme Court On Hate Speech: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत..

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik News: द्वेष मूलक वक्तव्यांबाबत (Hate Speech) सरकारकडून कुठलीच कारवाई होत नसल्याबद्दल काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. यावरुन शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांनीही जोरदार निशाणा साधला आहे.

"सुप्रिम कोर्टाने नपुंसक सरकार म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?" याबद्दल राज्य सरकारने आत्मचिंतन करावे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.

आज दिवसभर नाशिकमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत उद्घाटनाचे कार्यक्रम तसेच राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला.

काय म्हणाले अजित पवार...

"सुप्रिम कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर अजित पवार यांनीही शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. "सुप्रीम कोर्ट या सरकारला नपुंसक म्हणालं,मग हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा या सरकारचा अपमान नाही का? हा या सरकारचा कमीपणा नाही का?" असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला.

तसेच याबद्दल पुढे बोलताना, "आम्ही अधिवेशनाच्या वेळी 18 दिवस आम्ही तेच संगत होतो ते सरकार काय काम करत असं म्हंटलं की त्यांना राग येतो. याबाबतची केस कोर्टात आहे. त्यांच्याबद्दल बोललं की त्या सरकारला काही नेत्यांना राग येतो," अशी टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.

महापुरूषांचा आदर करण्याचा सल्ला..

"न्यायालयाने काहींची आमदारकी-खासदारकी रद्द ठरवली आहे. काहींना अपात्र ठरवलं आहे. ज्या महापुरुषांचा आदर आपण करतो, त्यांनी आपल्याला काय शिकवण दिलीये, हे लक्षात ठेवून त्यानुसार कारभार करायला हवा”, असंही अजित पवार म्हणाले. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT