Eknath Shinde - Ajit pawar- Devendra Fadnavis And Nawab Malik, Maharashtra Politics SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजस्थान-मध्यप्रदेशानंतर आता महाराष्ट्रातही धक्कातंत्र; अजित पवारांनी सांगितला महायुतीचा प्लान

Ajit Pawar Latest News: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धक्कातंत्राचा वापरण्यात येईल, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले आहेत

Satish Daud

Ajit Pawar Latest News

एकीकडे राजस्थान आणि मध्यप्रदेशातील धक्कातंत्राची चर्चा होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातही अशाच प्रकारचे धक्कातंत्र वापरण्यात येईल, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"लोकसभेसाठी महायुतीकडून महाराष्ट्रात सर्वेक्षण केले जाईल. तसेच जागावाटप आणि उमेदवारांची निवड ही विजयाच्या निकष लावूनच केली जाईल", असंही अजित पवार म्हणाले. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

नेमके काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांसोबत चर्चा मारताना अनेक गौप्यस्फोट केलेत. महायुती सरकारच्या कारभाराबाबत त्यांनी आपली भूमिका देखील मांडली. "आमदार नवाब मलिक यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यांनी पाठिंब्याचे शपथपत्र दिले असल्याचे जे बोलत आहेत, त्यांनी ते दाखवावे", असे आव्हान अजित पवार यांनी दिले.

"नवाब मलिक यांच्याबाबत भाजपला गैरसमज झाला आहे. त्यांना महायुतीत घेऊ नका, अशा आशयाचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला पत्र पाठवले होते. पण आता हा विषय संपला आहे", असे अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर प्रफुल पटेल यांच्यावरील आरोपही सिध्द झाले नसल्याचं त्यांनी सांगितलं.

'महाराष्ट्रात धक्कातंत्राचा वापर करणार'

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. सर्व मतदारसंघाची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच उमेदवाराचा निकष लावूनच जागा सोडण्यात येईल आणि उमेदवारी दिली जाणार असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. इतर राज्यांमध्ये जो धक्कातंत्राचा वापर झाला तो महाराष्ट्रातही होईल, असे स्पष्ट संकेत देखील अजित पवारांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मुंबईच्या दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT