महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'अजित पवार-प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं'; आमदार अमोल मिटकरींचं विधान

Amol Mitkari : अमोल मिटकरी यांनी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावे अशी साद अमोल मिटकरी यांनी घातलीय.

Girish Nikam

अजित पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एकत्र यावं, असं विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीये. शाहू-फुले-आंबेडकरांच्या वारसदारांनी एकत्र यावं, असं आवाहन अमोल मिटकरींनी केलंय. आरपीआयनंतर राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला साद घातली आहे. पाहूया एक रिपोर्ट.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काही दिवसांपूर्वीच आरपीआय नेते रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना एकत्र येण्याची साद दिली आहे. आंबेडकरांनी आरपीआयचं नेतृत्व करावं, अशी ऑफरही दिली. मात्र वंचितने आठवलेंची ऑफर धुडकावली होती. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं वंचितला साद घातली आहे. आमदार अमोल मिटकरींनी अजित पवार-प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं. शाहू-फुले-आंबेडकरांच्या वारसदारांनी एकत्र यावं, असं वक्तव्य केलं आहे.

वंचितनं विधानसभेसाठी काही उमेदवार जाहीर केले आहेत. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे. २०१९ मध्ये वंचितने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. २०१९ मध्ये विधानसभेला वंचितला २५ लाख मतदान झालं होतं. म्हणजेच ४.६% मते मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षानं निराशा केली. महायुतीत राष्ट्रवादी एकाकी पडल्याचं चित्र आहे. अनेक स्वकीय सोडून शरद पवारांच्या दाराशी जात आहेत. या पार्श्वभूमिवर दादांना मदतीचा हात हवा आहे. वंचित त्याला प्रतिसाद देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT