Ajit Pawar Plane Crash Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात कसा झाला? संपूर्ण घटनाक्रम समोर

Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे.

Priya More

Summary:

  • बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाला अपघात

  • अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू

  • विमान अपघातामध्ये अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्या विमानाचे तुकडे झाले आणि संपूर्ण विमान जळून खाक झाले. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याला मोठा धक्का बसला.

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त कळताच पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पवार कुटुंबातील सर्व सदस्य बारामतीकडे रवाना झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. विमानतळ प्रशासनाने अपघाताची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम -

१) जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या.

२) या सभांसाठी अजित पवार सकाळी साडेसातच्या सुमारास बारामतीला निघाले

३) मुंबई विमानतळावरून ते बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते

४) नियोजनानुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास अजित पवार हे बारामतीमध्ये पोहचणार होते.

५) पावणे नऊच्या सुमारास विमान लँडिंग करताना अपघात झाला. विमान बारामती एअरपोर्टजवळ शेतात कोसळले.

६) अजित पवारांचे विमान कोसळले आणि त्याचे तुकडे होऊन भीषण आग लागली.

७) विमानामध्ये तीन ते चार स्फोट झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले होते.

८) घटनास्थळावर तात्काळ पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या.

९) अजित पवारांसह सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

१०) सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक होती. या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली

११) या विमान अपघातामध्ये २ पायलट, अजित पवार, त्यांचा सुरक्षारक्षक आणि दोन स्वीय सहाय्यक यांचा मृत्यू झाला.

१२) अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार, युगेंद्र पवार बारामतीत पोहचले आहेत.

१३) सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिल्लीवरून रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT