Ajit Pawar Plane Crash Video Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: ८.४६ मिनिटं.. अचानक मोठा स्फोट, आगीच्या ज्वाळा...विमान कोसळतानाचा CCTV व्हिडिओ समोर

Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या विमानाचा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघाताचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. विमान कोसळताना या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

Priya More

Summary:

  • अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

  • बारामतीत विमान कोसळले

  • विमान अपघातात अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

  • हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला याचा व्हिडीओ समोर आला आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये प्रचारासाठी निघालेले अजित पवार यांचे विमान कोसळलं. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. हा विमान अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अपघाताचा थरार पाहायला मिळत आहे.

अजित पवारांचे विमान कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या अपघाताचा थरार रस्त्याच्या कडेला असलेल्या पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होतो. त्यानंतर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात पसरल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरून अपघाताची भीषणता समजून येत आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त अजित पवार यांच्या बारामतीमध्ये आज चार सभा होणार होत्या. या सभेसाठी अजित पवार आज सकाळी साडेसात वाजता मुंबईवरून बारामतीच्या दिशेने रवाना झाले. ते विमानाने बारामतीला जात होते. सकाळी ९ वाजता ते बारामतीत पोहचणार होते. पण बारामती विमानतळावर विमान लँडिंग करत असताना कोसळले. बारामती विमानतळाजवळ शेतामध्ये त्यांचे विमान कोसळले. हे विमान कोसळल्यानंतर त्याचे तुकडे झाले आणि आग लागली. या घटनेत विमान जळून खाक झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT