Political leaders raise serious questions over the aircraft black box in the Ajit Pawar plane crash investigation. Saam Tv
महाराष्ट्र

दादांच्या विमान अपघातावरून खळबळजनक दावा, विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता?

Ajit Pawar Aircraft Crash: अजित पवारांच्या विमान अपघातावरुन गंभीर आरोप होत असतानाच ब्लॅक बॉक्स बंद करण्यात आल्याचा दावा काही नेत्यांनी केलाय... त्यामुळे ब्लॅक बॉक्स कुणी बंद केला? विमान दुर्घटनेवरुन घातपाताचा संशय कसा बळावलाय?

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या विमान अपघाताला तब्बल 14 दिवस उलटून गेलेत... मात्र या अपघातामागे काही काळं-बेरं आहे का? असा सवाल राजकीय नेत्यांकडून वारंवार केला जातोय...अशातच विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील माहिती अद्याप बाहेर आलेली नसतानाच या प्रकरणाला नवं वळण मिळालयं..काँग्रेस प्रवक्ते अतुल लोढेंनी दादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता, असा दावा केलाय..

विमानाचा ब्लॅक बॉक्स हा असा एक भाग आहे जो कोणत्याही परिस्थितीत अपघाताची कारणे शोधण्यास मदत करतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्स बंद असणं हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य मानले जातं... त्यामुळे अपघातामागे ब्लॅक बॉक्स बंद असल्याचं कारण पुढे येत असेल तर घातपात असल्याचं सिद्ध होईल, असा दावा रोहित पवारांनी केलाय..

दरम्यान सॅटेलाईटद्वारे विमानाच्या लोकेशन आणि स्पीडबद्दल माहिती देणारे ट्रान्सपॉन्डर अपघाताच्या एक मिनट आधी बंद करण्यात आल्याचा दावा याआधीच रोहित पवारांनी केलाय... राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघातात मृत्यू होतो..आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा असणारा त्या विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' संशयाच्या भोवऱ्यात सापडतो... तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात...त्यामुळे अजितदादांच्या विमान अपघाताचं कोडं कधी सुटणार? ब्लॅक बॉक्समधील सत्य महाराष्ट्रासमोर कधी येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : बैलासोबत व्हिडिओ बनवणं पडलं महागात; विदेशी महिलेसोबत भयकंर घडलं, घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल, VIDEO

Men's Skin Care : पुरुषांनी उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या स्टेप्स

Youtuber anurag Dobhal: बिगबॉस फेम यूट्युबरने सोशल मीडियावर केली शेवटची पोस्ट; मनोरंजन सृष्टीत खळबळ

मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार; भाजपकडून रिक्त खुर्चीवर कोणाला संधी मिळणार? ४ जणांची नावे चर्चेत

Maharashtra Live News Update: बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचं जळगाव कनेक्शन

SCROLL FOR NEXT