Ajit Pawar speaking at Nagpur Chintan Shibir on political alliances, OBC quota and Rahul Gandhi’s allegations. Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: दोन्ही बंधू एकत्र आले तर....; उद्धव आणि राज ठाकरेंवर अजित पवारांचं मोठं विधान

Uddhav and Raj Thackeray Coming Together: नागपूरमधील चिंतन शिबिरात अजित पवार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर, मंत्र्यांना दिलेल्या इशाऱ्यावर, ओबीसी आरक्षण आणि राहुल गांधींच्या आरोपांवर भाष्य केले.

Omkar Sonawane

नागपूरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर सुरू असून साम टीव्हीशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर मोकळेपणाने उत्तरे दिली. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसे आणि उबाठाला यश मिळवता आले नाही. आता काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार अशी चर्चा जोरदार रंगू लागली आहे. किंबहुना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झालेली पाहायला मिळू शकते.

यावरच अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर देत या विषयावर अधिकचे बोलणे टाळले. ते म्हणाले, ते एकत्र आले तर येउद्या. तसेच सकाळच्या भाषणात अजित पवार यांनी मंत्र्याना इशारा दिला होता की, मुंबईत बसून राहू नका ज्या जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे तेथे जा आणि स्थानिक आमदारांना घेऊन लोकांमध्ये फिरा तसेच कार्यकर्त्यांना भेटा असा सल्ला दिला होता. यावर स्पष्टीकरण देत पवार म्हणाले, काही लोकांनी तक्रारी केल्या म्हणून जनतेची कामं थांबवू नका, काम करा. अन्यथा खुर्ची खाली करावी लागेल. पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा होतो. मी स्वतः कार्यकर्त्यांच्या जोरावरच मोठा झालो आहे. असे अजित पवार म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत म्हटलं, जीआरमुळे ओबीसींचं नुकसान झालं, असा भुजबळ साहेबांचा समज झाला. ते ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांना नुकसान झालेलं नाही असं सांगितलं, पण त्यांचा गैरसमज झालाय.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून व्होट चोरीचा आरोप करत आहे. तसेच त्यांनी याबाबत अनेक पुरावे देखील दिलेय. काल देखील त्यांनी कर्नाटक येथील झालेल्या मतदानामध्ये गंभीर आरोप करत थेट पुरावेच सादर केले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, राहुल गांधींनी कोणताही बॉम्ब फोडू द्या, आम्हाला काही फरक पडणार नाही.

ओबीसींमध्ये नवीन लोकांच्या राजकीय सहभागावर बोलताना अजित पवार म्हणाले, ओबीसींमध्ये नवीन लोक आले तर नुकसान होणारच ना? कुणाला बाहेर काढलेलं नाही, पण त्यामुळे काहींना जागा मिळणार नाही, त्या जागा नवीन लोकांनी घेतल्या आहेत असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ कंटेनरला लागली आग

Amitabh Bachchan: 'मला नियम समजावू नका...'; १० वर्षाच्या मुलाने अमिताभ बच्चन यांचा केला अपमान

Diwali Good Luck: दिवाळीत करा हे ५ सोपे वास्तु उपाय, सुख - समृद्धीसह, लक्ष्मी येईल घरात

Bhaubeej Gift : यंदाची भाऊबीज कायम राहील लक्षात, भावंडांना द्या टेक-फ्रेंडली गिफ्ट्स

Gold Silver Price : दिवाळीआधी चांदीच्या दरातही रेकॉर्डब्रेक वाढ, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर

SCROLL FOR NEXT