Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

NCP VS Shivsena: फिक्सरचा मुद्दा, मित्र पक्षांनाच गुद्दा; शिंदेंच्या नेत्यावर राष्ट्रवादीचा वार

Maharashtra Politics: फिक्सर प्रकरणानंतर शिंदे-फडणवीसांतील मतभेद शांत होण्याचे संकेत होते. मात्र, आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट शिंदे गटाच्या नेत्यांवर निशाणा साधत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Dhanshri Shintre

फिक्सर पीएवरुन शिंदे-फडणवीसांमधील धुसफूस कमी होती की काय? आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट शिंदेंच्या नेत्यांवर वार केलाय. शिंदेंच्या मंत्र्यांच्या पीएने पैसे मागितल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय. नेमका हा आरोप काय आहे आणि शिंदेंच्या कोणत्या मंत्र्याच्या पीएने पैसे मागितले? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहा.

फिक्सर पीएंना यापुढे थारा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर या मुद्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीएंनी कामं मंजूर करण्यासाठी ५ लाखांची मागणी केल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय.

फक्त माजी मंत्री भुमरेंचा पीएच नाही तर शिंदे गटाच्या इतर मंत्र्यांचीही नावं मिटकरींनी घेतले आहेत. पाहूयात मिटकरींनी कोणत्या मंत्र्यांच्या पीएंवर आरोप केले आहेत.

कोणत्या मंत्र्यांच्या पीएवर आरोप?

संदीपान भुमरे

अब्दुल सत्तार

संजय राठोड

तानाजी सावंत

महायुती सरकारमध्ये नियुक्ती रखडवलेले फिक्सर पीए शिंदेंचेच असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही शिंदेंच्या माजी मंत्र्यांच्या पीएंकडे बोट दाखवल्याने फिक्सिंगचा मुद्दा आणखीच गाजण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४२ पैकी ३३ मंत्र्यांचे पीए नियुक्त केले आहेत.

ओएसडी नियुक्तीच्या शेवटच्या यादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आणि भाजपच्या ४ मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र या यादीत शिंदे गटाच्या मंत्र्यांना डावलल्याचं चित्र आहे. त्यामुळे मंत्रालयातील फिक्सिंग रोखण्यात मुख्यमंत्री फडणवीसांना यश येणार की निर्ढावलेली यंत्रणा फिक्सर पीएंना पाठीशी घालणार? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar: मोठी बातमी! आजपासून 'या' लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १० हजार, नेमकी योजना काय?

Nandurbar : नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक प्रकरण; आरोपी पकडण्यासाठी गुजरात व मध्यप्रदेश पोलिसांची मदत

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT