Maharashtra NCP ministerial reshuffle latest updates saam tv
महाराष्ट्र

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

Ncp Merger Talks Ajit Pawar Sharad Pawar Party: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवारांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांची भेट घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडलीये. मात्र, ही बैठक संपताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीये. त्यामुळे राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीये. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यात मोठा फेरबदल करण्यात बाबत हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. सुमारे 9 पैकी 5 मंत्री बदलण्याच्या हालचाली आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माजी मंत्र्यांना पुन्हा संधी देणार की नवीन चेहऱ्यांना समोर आणणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जाताहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थ खातं अद्याप मिळालं नसल्यानं पक्षाच्या नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळतेय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी यासंदर्भात मोठं विधान केलंय.

तर दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणासंदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यात बदल आणि अर्थ खात्यावरून खलबतं सुरू आहते. त्यातच अर्थ खात्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची बुधवारी दिल्लीत बैठक झाल्याची माहिती समोर आलीये. विशेष म्हणजे, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमित शाहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील बैठक पार पडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आपल्या वाट्याचं अर्थ खातं राष्ट्रवादीला पुन्हा मिळणार का? आणि राष्ट्रवादी भाकरी फिरवली जाणार का?... हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

SCROLL FOR NEXT