Shruti Vilas Kadam
पैठणी साडी नेसल्याने पारंपरिक लुक छान दिसतो. मोर, कमळ आणि सुंदर काठ असलेली पैठणी साडी नेसा. त्यासोबत कपाळावर चंद्रकोर लावा. लग्न आणि सणांसाठी हा लुक छान दिसेल.
लाल रंगाची साडी प्रत्येक महिलेला सुंदर दिसते. लाल साडीसोबत चंद्रकोर, नथ आणि हिरव्या बांगड्या घाला. लग्नसमारंभासाठी हा लुक उत्तम आहे.
हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसून तुम्ही सुंदर पारंपरिक लुक करू शकता. त्यासोबत सोन्याचे दागिने आणि कपाळावर चंद्रकोर लावा. पूजा आणि सणांसाठी हा लुक छान दिसेल.
महाराष्ट्रीयन लुकसाठी नऊवारी साडी हा उत्तम पर्याय आहे. नऊवारी साडीसोबत चंद्रकोर, नथ, ठुशी आणि केसांचा अंबाडा करा. यामुळे तुमचा पारंपरिक लुक अधिक सुंदर दिसेल.
सिल्क साडी नेसल्याने लुक अधिक आकर्षक दिसतो. जांभळ्या, मरून किंवा राणी रंगाची सिल्क साडी निवडा. त्यासोबत चंद्रकोर आणि सोन्याचे दागिने घाला.
गोल्डन बॉर्डर असलेली साडी खूप सुंदर दिसते. अशा साडीसोबत सोन्याचे दागिने आणि कपाळावर चंद्रकोर लावा. लग्न, रिसेप्शन आणि सणांसाठी हा लुक छान आहे.
तुम्हाला पारंपरिक आणि मॉडर्न असा दोन्ही प्रकारचा लुक हवा असेल तर पेस्टल रंगाची डिझायनर साडी नेसा. त्यासोबत छोटी चंद्रकोर, सुंदर ब्लाउज आणि हलके दागिने घाला. यामुळे तुम्हाला स्टायलिश लुक मिळेल.