Winter Snake Safety Tips: थंडीच्या दिवसांत साप घरात का शिरतात? घराबाहेर लगेच काढून टाका 'या' ३ गोष्टी!

Shruti Vilas Kadam

घराजवळ कचरा साठवू नका

घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत जुनी पाने, लाकडे, विटा आणि भंगार ठेवू नका. अशा ठिकाणी साप लपून बसू शकतात. त्यामुळे घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.

Winter Snake Safety Tips

घरातील भेगा बंद करा

घराच्या भिंतींना पडलेल्या भेगा, दरवाज्याखालील फटी आणि खिडक्यांमधील मोकळ्या जागा बंद करा. अशा फटींमधून साप घरात येऊ शकतात.

Winter Snake Safety Tips | Pintrest

घरात उंदीर होऊ देऊ नका

उंदीर हे सापांचे खाद्य आहे. त्यामुळे घरात उंदीर असतील तर साप येण्याची शक्यता वाढते. अन्नपदार्थ झाकून ठेवा आणि घरातील कचरा वेळेवर टाका.

Winter Snake Safety Tips | Pintrest

बूट घालण्यापूर्वी तपासा

हिवाळ्यात साप उबदार जागी लपून बसू शकतात. त्यामुळे बाहेर ठेवलेल्या बुटांमध्ये साप लपलेला असू शकतो. म्हणून बूट घालण्यापूर्वी ते नीट तपासा.

Winter Snake Safety Tips

घरातील जुने सामान काढून टाका

घरातील कोपऱ्यांमध्ये जुने कपडे, बॉक्स आणि भंगार साठवू नका. अशा वस्तूंमध्ये साप लपण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील अडगळ वेळोवेळी स्वच्छ करा.

Winter Snake Safety Tips

घराजवळ गवत आणि झुडपे वाढू देऊ नका

घराच्या आजूबाजूला उंच गवत आणि झुडपे असतील तर ती वेळोवेळी कापून घ्या. तसेच घराजवळ पाणी साचू देऊ नका. यामुळे साप लपण्यासाठी जागा मिळण्याची शक्यता कमी होते.

Winter Snake Safety Tips

घरात साप दिसल्यास काय करावे?

घरात साप दिसल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यापासून दूर राहा. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा. ताबडतोब सर्पमित्र किंवा वन विभागाला संपर्क करा.

Winter Snake Safety Tips | canva

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Winter Snake Safety Tips

Hair Care: थंडीत केस ड्राय आणि डल होतात? आठवड्यातून एकदा लावा हा घरगुती हेअर मास्क केस होतील मऊ आणि चमकदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा