Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवारांचा फायरब्रँड नेता धडाडणार! आधी प्रवक्ते पदावरून हटवलं, पण ४८ तासात स्टार प्रचारकाच्या यादीत

Maharashtra Political News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आमदार अमोल मिटकरींचा देखील समावेश आहे.

Alisha Khedekar

राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली

अमोल मिटकरी, अजित पवार, प्रफुल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे आदींचा समावेश

अजित दादांच्या विचाराचा प्रचारक म्हणून आपल्याकडे असलेले पद सर्वोच्च - अमोल मिटकरी

स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार मोहिमेला वेग

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजांना वेग आला आहे. अशातच आज आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय. जवळपास ४० जणांची स्टार प्रचार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा देखील समावेश आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदावरुन हटवलं होते. अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची नव्या प्रवक्ते यादीतून नावे गायब आहेत. याबाबत आमदार मिटकरींची प्रतिक्रिया देत. हकालपट्टी आणि उचलबांगडी शब्द माध्यमांनी चवीने लावल्याचं मिटकरींनी म्हटलं होतं. याबाबत अधिकृत पत्र पक्षाकडून मिळाले नसल्याचे ते म्हणाले होते. आज अजित दादांच्या विचाराचा प्रचारक म्हणून आपल्याकडे असलेले पद सर्वोच्च असल्याच मिटकरींनी म्हटले. दरम्यान, आज आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली.

या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील - चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ यांचा समावेश आहे.

तसेच या यादीत आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक - शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

Kalyan News : अंगावर आरपीएफचा युनिफॉर्म अन् अधिकारीचा थाट, ऑफिसरचा सेल्फी मागितल्यानं उलगडला खेळ

SCROLL FOR NEXT