NCP MLA Idris Nayakwadi sparks outrage with threat against Sanjay Raut after his controversial “half Pakistani” remark on Deputy CM Ajit Pawar. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

Idris Nayakwadi statement on Sanjay Raut: अजित पवारांच्या आमदाराने थेट संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा केलीय... मात्र त्याचं कारण काय? महाष्ट्राची राजकीय संस्कृती खरंच रसातळाला गेलीय का?

Bharat Mohalkar

ही भाषा तुम्हाला एखाद्या गुंडाची वाटत असेल....पण नाही.. हे आहेत सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी.. त्यांनी गावगुंडाप्रमाणे थेट संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा करुन महाराष्ट्राच्या राजकारणात भाषेचा घसरलेला स्तर दाखवलाय...मात्र या वादाची सुरुवात झाली ती भारत पाक मॅचमुळे... अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांचा तोल सुटला..

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री.. मात्र त्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट अर्धा पाकड्या म्हणत संजय राऊतांची जीभ घसरली....आता राऊतांवर टीका करण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी तर थेट कळसच गाठला...आणि संजय राऊतांची जीभ हासडण्याचीच भाषा केली.

खरंतर महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, एस एम जोशी, प्र. के अत्रे यांच्या राजकीय सुसंस्कृतपणाचा इतिहास आहे....मात्र गेल्या काही वर्षात कमरेखालची भाषा वापरुन राजकारणातला टीकेचा स्तर खालावत चालल्याचं चित्र आहे,. त्यामुळे जसा नेता तसा कार्यकर्ता म्हणीप्रमाणे आमदार, खासदारांकडे बघून कार्यकर्ते तसंच वागत असतात.. त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्राला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा सांगणारे अजित पवार आपल्या आमदाराला समज देणार का? हा खरा प्रश्न आहे,..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT