Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Akola News : दहिहंडाफाटा–गोपालखेड मार्गावरील गंभीर दुरवस्थेविरोधात रयत शेतकरी संघटना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणार. शेकडो जीव घेणाऱ्या या ‘मृत्यूमार्गा’च्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे.

Alisha Khedekar

  • दहिवंडाफाटा–गोपालखेड रस्ता खड्डेमय व जीवघेणा बनला

  • शेकडो लोकांचे जीवितहानी व अपंगत्वाची प्रकरणे

  • रयत शेतकरी संघटनेचा अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

  • तातडीने रस्ता दुरुस्ती व दोषींवर कारवाईची मागणी

अकोला, अक्षय गवळी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज अकोल्यातील अकोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपालिका प्रचारासाठी येत आहेत. अजित पवार विमानाने अकोला विमानतळावर येणार आहेत. त्यानंतर ते अकोला ते अकोट हा प्रवास रस्ता मार्गाने करणार आहे. याच मार्गावरील दिड वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या दहीहांडा फाटा ते गोपालखेड या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

खड्डे आणि धुळीमूळे झालेल्या अपघातामुळे काही लोकांना प्राणाला मुकावं लागलं, तर अनेकांना अपंगत्व आलं. त्यावर अनेकदा सरकार आणि प्रशासनाला विनंती करूनही रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. यावरून अनेकदा आंदोलनं करणाऱ्या रयत शेतकरी संघटनेने थेट या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामूळे या मार्गावर आज मोठा पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे. दरम्यान, पोलीसांनी सकाळपासूनच रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याची शोध मोहिम सुरू केली आहे.

अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दहिहंडाफाटा ते गोपालखेड रस्ता हा स्थानिक जनतेचा संतापाचा विषय ठरला आहे. खड्डेमय, जीवघेणा आणि ‘मृत्यूमार्ग’ बनलेल्या या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात रयत शेतकरी संघटना उद्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून जोरदार निषेध नोंदवणार आहे.

काम शून्य… आश्वासने मात्र ढिगाने!

रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याबाबत आम्ही वारंवार निवेदनं दिली, अल्टिमेट दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनं दिली खरी, परंतु प्रत्यक्षात काम एक इंचही पुढे नाही. हे सर्व काम कागदावरच. त्यामुळेच आज उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निष्क्रियतेचा भंडाफोड करणार आहोत. असे पूर्णाजी खोडके म्हणाले.

शेकडो जीव धोक्यात… त्यामुळेच कठोर इशारा!

हा रस्ता रोज शेकडो लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. अजित पवार यांचा ताफा या मार्गाने जाणार आहे, त्यामुळं शांततापूर्ण पण कठोर पद्धतीने त्यांच्या ताफ्यासमोर उभे राहून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही आमची शेवटची टोकाची हाक असणार असल्याचेही खोडके म्हणालेत.

नेमकं प्रमुख मागण्या काय?

दहिहंडा–फाटा–गोपालखेड रस्त्याचे पूर्णपणे नव्याने दर्जेदार पद्धतीने डांबरीकरण करण्यात यावं. निष्क्रिय अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. अकोला अकोट रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशा प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, अकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आज उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर आणि रयत शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर केंद्रित झाले आहे. रस्ता दुरुस्तीच्या दीर्घ प्रलंबित प्रश्‍नाला यानिमित्ताने न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Maharashtra Live News Update: पुण्यातील प्रभाग ९ चे राजकारण तापणार!

Mumbai Local: पश्चिम रेल्वेवरील लोकल वेळेत धावणार, नवीन मार्गिकेचं काम पूर्ण; कधीपासून होणार सुरु?

Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

Baba Vanga: बाबा वेंगांनी सांगितली 2026 मधली तिसऱ्या महायुद्धापासून एलियन्सपर्यंतची भाकीतं

SCROLL FOR NEXT