Ajit Pawar says Railway Department is responsible for Mumbra local train accident that killed 5 commuters. He demands strict action and safety reforms in suburban services. saam tv
महाराष्ट्र

Mumbai Local Accident : मुंब्रामधील ५ जणांच्या मृत्यूला रेल्वेच जबाबदार, अजित पवारांनी थेट सांगितलं

Ajit Pawar On Mumbai Local Accident Mumbra station :मुंब्रामध्ये फास्ट लोकलच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेसाठी रेल्वे विभागालाच जबाबदार धरलं आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Accident Mumbra diva station : मुंब्रा येथे झालेल्या फास्ट लोकल दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला प्रवासी जबाबदार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते, यावर अजित पवार यांच्याकडून प्रतिक्रिया आली आहे. मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभाग जबाबदार आहे, याला कुणीही नाकारू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंब्रा येथे घडलेल्या रेल्वे अपघाताबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. या अपघाताची जबाबदारी रेल्वे विभागाची असल्याचे स्पष्ट केले आहे. "या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे, हे कोणी नाकारू शकत नाही," असे पवार यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पवार यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. "दोन-तीन मिनिटांनी लोकल ट्रेन सुटते. डबे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या गतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे," असे त्यांनी नमूद केले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू असून, त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी आश्वासन दिले. "चौकशीत जे समोर येईल, त्यानुसार सर्व आवश्यक पावले उचलली जातील," असे त्यांनी स्पष्ट केले.

मध्य रेल्वे मुंब्रा जवळ आज सकाळी दुर्घटना घडली. दोन लोकल एकमेकांच्या जवळ जाताना लोक मोठ्या प्रमाणात लटकलेली असतात, लोकांना वेळ महत्त्वाचा असतो, लटकलेले प्रवासी घासले गेले ट्रॅकवर पडले. यात सहा आकडा आला आहे. मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात लोकल यंत्रणा आहे,मोठ्या प्रमाणात गर्दी असते, अनेक जुने ब्रीज काढून नवीन ब्रीज काम केले . अशा घटना घडल्यानंतर ऑडिट करून घेण्याची मागणी समोर येते. केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवी साहेबांची संपर्क साधणार आहे,काय करावे लागेल याच पहावे लागणार आहे. लोकल दरवाजे केले तर कसे होणार तुम्हाला माहिती आहे, असेही अजि पवार म्हणाले.

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक - उपमुख्यमंत्री अजित पवार

“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियाची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

SCROLL FOR NEXT