Ajit Pawar
Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'अडकवण्याचा प्रयत्न केला तर...'; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच ठणकावलं

Ruchika Jadhav

Ajit Pawar: राज्यात महापुरुषांवर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या उल्लेखामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अशात सातत्याने होत असलेले आरोप प्रत्यारोप यांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावलं आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत त्यामुळे जर कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते राष्ट्रवादी सहन करणार नाही.", असे अजित पवारांनी सर्वांना ठणकावून सांगितले आहे. (Latst Political News)

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. " राज्यात ज्या घटना घडत आहे त्यामध्ये सत्ताधारी पक्ष वेगळे वातावरण निर्माण करत आहेत. आम्ही पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जातोय. आमच्या पक्षात सर्व जाती धर्माचा आदर केला पाहिजे असेच सांगितले जाते आणि आम्ही तसेच करतो.", असे अजित पवार म्हणाले.

यात त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुह्यांवर बोलताना सत्ताधाऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. " विरोधकांना त्रास देण्याकरिता कुणाला अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाडांवर दोन गुन्हे दाखल केले होते, चुका असतील त्यावर जरूर कारवाई करावी. पण मुद्दाम कुणाला ही उभं करून केस टाकली ही राज्याची परंपरा नाही. आमच्या काळात सत्तेत असताना आम्ही असं केलं नाही आता असं कोणी केलेलं आम्ही सहन करणार नाही. जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही नाही." असे अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singapore Coronavirus Cases : कोरोनाचा पुन्हा कहर; रुग्णांची संख्या 25 हजारांच्या पुढे

Akola Accident: रॉग साईंडनं आलेल्या ट्रकनं कारला चिरडलं; कारचा चुराडा

Beed News : गाढ झोपेतच मृत्यूने गाढले; अंगावरून डंपर गेल्याने २ तरुणांचा मृत्यू

Andaman Monsoon News | अंदमानात मान्सूनची हजेरी,नागरिकांना दिलासा!

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT