Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: दादांना हवं फिरतं मुख्यमंत्रिपद? सीएमपदासाठी अजित पवार यांची अमित शहांना गळ?

Snehil Shivaji

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची मोठी प्रतिष्ठा आहे. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हंटलं जातं. मात्र याच मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगलीय. त्याला कारण ठरलंय अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपद फिरतं ठेवा, अशी मागणी अजित पवारांनी अमित शाहांकडे केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शाहांची बैठक झाली होती. या बैठकीत अजित पवारांनी थेट मुख्यमंत्रिपदावर बोट ठेवल्याची चर्चा रंगलीय. तर फिरत्या मुख्यमंत्रिपदावरून विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवलीय.

याबाबतच बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) म्हणाले की, ''फिरत्या रंगमंचाप्रमाणे फिरतं मुख्यमंत्रिपद.'' तर ठाकरे गटाचे (Thackeray Group ) नेते अंबादास दानवे म्हणाले की, ''फिरतं मुख्यमंत्रिपद नको, संगीत खुर्ची हवी.'' मात्र अजित पवार याना फिरत्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा सुनील तटकरेंनी (Sunil Dattatray Tatkare) फेटाळून लावल्यात आहेत. तटकरे म्हणाले की, ''मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली नाही.''

महायुतीत ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला मुख्यमंत्रिपद, असं विधान अजित पवारांनी केलं होतं. तीच लाईन देवेंद्र फडणवीस यांनीही पुढे नेली. मात्र आता जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदरात कमी जागा पडण्याची शक्यता असल्याने दादांनी फिरत्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याची चर्चाय. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? हे विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT