Ajit Pawar group Leader Praful Patel said I am still in touch with Sharad Pawar NCP Crisis Latest Updates Saam TV
महाराष्ट्र

NCP Crisis: मी आजही शरद पवारांच्या संपर्कात, अजितदादांच्या गटातील बड्या नेत्याचा दावा; राष्ट्रवादीत चाललंय काय?

NCP Crisis Latest News: माझ्यात आणि शरद पवारांमध्ये नेहमी चर्चा होत असते, मी आजही त्यांच्या संपर्कात आहे, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

Satish Daud

NCP Crisis Latest News:

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीतील अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना पाठींबा दिला आहे. तर काही आमदार तसेच पदाधिकारी आजही शरद पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांची सातत्याने मनधरणी सुरू आहे. मात्र, शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. माझ्यात आणि शरद पवारांमध्ये नेहमी चर्चा होत असते, मी आजही त्यांच्या संपर्कात आहे, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे पक्ष फुटलेला असताना राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असून ते कुणाला शह आणि काटशह देत आहेत? पडद्यामागे नेमकं चाललंय काय? राष्ट्रवादीच्या या खेळीचा अर्थ काय? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.

काय म्हणाले प्रफुल पटेल

अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल रविवारी अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्या सोबत आलो होतो. आज अजित पवार यांच्या सोबत आलो आहे. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी मी आलो आहे, असं सांगितलं.

अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच मी इकडे आलो? की शरद पवार यांनी मला पाठवले का? शरद पवार साहेब यांच्या बदल असलेला आदर आजही कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असं विधानही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केलं.

माझे शरद पवार यांच्यासोबत १९७८ पासूनचे संबंध आहे, माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी हा गौप्यस्फोट करून एकप्रकारे भाजपलाच इशारा दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

Kanda Poha Recipe: मऊ आणि मोकळे कांदा पोहे बनवण्यासाठी 'या' 5 सोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT