Sharad PAwar- Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News : शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळणार? विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

Ajit Pawar CM Post News : शरद पवार बीड दौऱ्यावर आहेत. ते भाषणात काय बोलतात याकडे आमचं लक्ष आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेना-भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना आशीर्वाद द्यावा अशी गळ घालताना दिसत आहे. यासाठी त्यांनी काही प्रयत्नही केल्याचं दिसून आलं आहे.

तर काही दिवस आधी अजित पवार यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र हा सगळा खटाटोप मुख्यमंत्रीपदासाठी सुरु असल्याचं काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एका वक्तव्यातून सूचित केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, दोन पक्ष फुटल्यानंतरही भाजपला जनाधार का मिळत नाही याची चिंता भाजपला आहे. त्यामुळे जनाधार असलेले शरद पवार सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल, अशी अट अजित पवार यांना घातली आहे. त्यामुळेच शरद पवार यांना सोबत चला म्हणून त्यांचा आग्रह असू शकेल. म्हणून ते दया याचना करत असतील. (Latest Marathi News)

शरद पवार बीड दौऱ्यावर आहेत. ते भाषणात काय बोलतात याकडे आमचं लक्ष आहे. आम्ही दोघे सोबत आहोतच, तिघेही सोबत आहोत. परंतु संभ्रम कायम आहे, तो दूर झाला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाऊ, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. (Maharashtra News)

अजित पवार गटाचं प्रत्युत्तर

विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यानंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी म्हटलं की, विरोधी पक्षनेता झाल्यावर विजय वडेट्टीवार कल्पोकल्पित दावा करण्यात आघाडीवर आहेत, असं दिसतंय. बाकी त्यात काही तथ्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

SCROLL FOR NEXT