NCP, dr. yogesh kshirsagar, jaydutt kshirsagar saam tv
महाराष्ट्र

NCP vs NCP : यापुढं काकांचा फाेटाे बॅनरवर वापरणार नाही! पुतण्याने दिली ग्वाही; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आवाहन

बीड येथे होणाऱ्या अजित पवार यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली.

विनोद जिरे

Beed News : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ncp leader ajit pawar) यांच्या गटात प्रवेश केलेल्या डॉक्टर योगेश क्षिरसागर (dr. yogesh kshirsagar) यांनी आजपासून त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (former minister jaydutt kshirsagar) यांचा फाेटाे बॅनरवर वापरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. साम टीव्हीशी संवाद साधताना डाॅ. क्षीरसागर यांनी भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra News)

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात डॉक्टर योगेश क्षिरसागर यांनी प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपला फोटो बॅनर वापरू नये असे म्हटले होते. यावर आता डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

डॉक्टर योगेश क्षीरसागर म्हणाले त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेचा सन्मान करू, यापुढे त्यांचा फोटो बॅनरवर वापरणार नाही. त्याबाबत सहका-यांना सूचना देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आज (शुक्रवार) नवगण राजुरी येथे श्री गणेशाचे दर्शन घेऊन कामाला प्रारंभ केला. बीड येथे होणाऱ्या अजित पवार यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी पाहणी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निकाला आधीच विजयाचा जल्लोष! पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले

MI vs CSK: दुखापत सँटनरच्या खांद्याला, तरीही शार्दुल कसा खेळला? मुंबई इंडियन्सने दिलं उत्तर

Weight Loss Recipe : डाएटला करा टाटा, बाय बाय; चटपटीत चाट खाऊन वजन होईल कमी, वाचा रेसिपी

Good News : मुंबई-पुण्यातून धावणार २४८ विशेष उन्हाळी ट्रेन, सर्व यादी एका क्लिकवर

डोंबिवलीत स्टंटबाजांचा कहर! बाईकवर उभा राहून तरुणाचा जीवघेणा स्टंट, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT