Ajit Pawar addressing a massive campaign rally in Bhagur, declaring himself as Nashik’s Guardian Minister. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाशिकचा पालकमंत्री ठरला? अजित पवारांनी स्वतःच नाव जाहीर केलं

Nashik Guardian Minister Controversy: नाशिकच्या भगुरमधील सभेत अजित पवार यांनी थेट मीच तुमचा पालकमंत्री असल्याचा दावा करत शिंदे गटावर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महाविकासआघाडीचे अनेक दिग्गज नेते अद्यापही प्रचारापासून दूर आहे. तर महायुतीच्या नेते मात्र या निवडणुकीमध्ये पूर्णपणे मैदानात उतरले आहे. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी महायुती ही मैत्रीपूर्ण लढत असून शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकमेकांच्या विरोधात लढत आहे. अशातच आजचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा नाशिकमध्ये एकमेकांच्या विरोधात सभांचा धडाका सुरू आहेत. सरकार म्हणून महायुती जरी असली तरी शिंदे, फडणवीस आणि पवार हे एकमेकांवर नाव न घेता टीका करताना दिसत आहे.

नाशिकच्या भगुरमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गट अशी थेट लढत आहे. नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाकडून प्रेरणा बलकवडे तर शिंदे गटाकडून अनिता करंजकर यांची लढत पहायाला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंद यांनी सभा घेत भगुर शहरासाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आणि आपल्याकडे नगरविकास खातं आहे आणि त्यामुळे निधींची कमतरता भासणार नाही असे आश्वासन देत एकप्रकारे अजित पवारांना आव्हान दिलं.अशातच आज संध्याकाळी अजित पवारांची भगुरमध्ये सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी थेट नाशिकचा पालकमंत्री मी आहे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या.

राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरु आहे. रायगडमध्ये आदिती तटकरे विरुद्ध भरत गोगावले तर नाशिकमध्ये गिरीश महाजन विरुद्ध छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशातच आज अजित पवारांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर आपले नाव कोरल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही सगळे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचाराने काम करतो. इथं जी आम्ही आघाडी केली त्यात भाजप, राष्ट्रवादी आणि उबाठा आहे. आम्ही स्थानिक लोकांना मुभा दिली. आम्ही सगळेजण महायुतीचे काम करतो. पण या ठिकाणी आमच्या विरोधात शिंदेसेना आहे. मला आता व्हिडिओ दाखवला त्यात किती कचरा उडत होता. एकनाथ शिंदे भगूर येथील सभेसाठी हेलिकॉप्टरने आले असता, हेलिकॉप्टरमुळे मोठ्या प्रमाणात कचरा उडाला होता. यावरच अजित पवारांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

पवार पुढे म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या बारामतीत काम केले. तुम्ही निवडून द्या तोच विकास होईल. माझ्याकडे कितीपण हेलिकॉप्टर पाठवा कचरा उडत नाही. तुम्हाला केंद्र सरकार आणि देवंद्रजी आम्ही मदत करायला तयार आहे. नियोजन खातं आणि अर्थ खातं माझ्याकडे आहे. अजून तुमचा पालकमंत्री नाही. मीच तुमचा पालकमंत्री आहे असे समजा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन अजित पवारांनी उपस्थितांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT