Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक; गटनेतेपदाच्या निवडीसाठी होणार बैठक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक; गटनेतेपदाच्या निवडीसाठी होणार बैठक

वाकड परिसरात एम डी ड्रग्स विक्रीस घेऊन आलेल्या तरुणास अटक

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात एम ड्रग्स विक्रीस घेऊन आलेल्या तरुणाला सापळा रचून वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पोलिस अंमलदार वंदू गिरे यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी एलिया ऊर्फ बॉक्सर प्रवीण कांबळे हा वाकड मधील जगताप डेअरी परिसरात बेकायदा एम डी ड्रग्स विक्रीस घेऊन आला होता , त्याला ताब्यात घेतले असता त्याच्या कडून 7.92 ग्रॅम एम डी ड्रग्स ज्याची किंमत 39 हजार 600 रुपये, एक मोबाईल फोन, एक दुचाकी असा 1 लाख 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर पार्थ यांचा सुनेत्रा पवारांना फोन

पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर पार्थ यांनी सुनेत्रा पवार यांनी फोन केला आहे.

पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असं नाव द्या, जालन्यात मराठा महासंघाची मागणी

पिंपरी चिंचवड शहराला अजित नगर असं नाव द्याव अशी मागणी जालन्यात अखिल भारतीय मराठा महासंघाने केलीय.अजित दादांनी पिंपरी चिंचवड शहराला आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका बनवली अजित दादांच्या प्रयत्नामुळेच आज पिंपरी चिंचवड शहराचं नाव जगामध्ये आहे.आम्ही लोकप्रतिनिधी मार्फत आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पिंपरी चिंचवड शहराला अजित पवारांचं नाव घेण्याची मागणी केली आहे.

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या बीडच्या दोघांना तामिळनाडूमध्ये अटक

बीडच्या केज तालुक्यातील डोका या गावच्या माजी सरपंच सह अन्य एकाजणास तामिळनाडू पोलिसांनी अटक केली आहे... या दोघांनी तामिळनाडूमध्ये गाडीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर दिलेल्या नोटा बनावट असल्याचे त्या पेट्रोल पंप चालकाला निदर्शनास आले होते.. यानंतर त्याने स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या... रमेश भांगे व नारायण राम असे या दोघांची नावे आहेत... या दोघांनी तामिळनाडूतील इतर काही शहरांमध्ये देखील अशाच पद्धतीने बनावट नोटा चलनात आणण्याची माहिती समोर आली आहे.. आता या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास तामिळनाडू पोलीस करत आहेत.

पार्थ पवार हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी दाखल

  • पार्थ पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत दाखल झाले आहेत

  • सध्या गोविंद बागेत पवार कुटुंबियातील सदस्य उपस्थित आहेत

  • शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार आणि नुकतेच दाखल झालेले पार्थ पवार

अजितदादा माझ्या घरी आलेले, विलीनीकरणावर जयंत पाटील यांचं मोठं विधान

  • शरद पवारांच्या देखतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हायची ही अजितदादांची इच्छा होती

  • अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा दादा स्वतः माझ्या घरी आले होते.

  • चार वेळा माझ्या घरी येऊन जेवण करून चर्चा पूर्ण करून गेले आहेत.

  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी माझ्या घरी आठ ते दहा वेळा चर्चा झाली

  • दोन ते तीन बैठका अजित दादांच्या भावना व्यक्त करताना झाले आहेत शरद पवारांच्या बद्दल अजितदादांना प्रचंड आदर होता.

  • जे झालं ते विसरून, पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी जोमाने पुढे नेण्याची,अजितदादांची तीव्र आणि आग्रही भूमिका होती.

  • 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता अजितदादांनी माझ्यावर तारीख ठरवण्याची जबाबदारी सोपवली होती.

  • 16 जानेवारी रोजी पार पडलेल्या अजित दादा सोबत च्या बैठकीत हा निर्णय झाला होता

सोना चांदीच्या भावात घट, गुंतवणूकदारांना दिलासा

जळगाव सुवर्ण बाजारात गुरुवारी (ता. २९) चांदीने भावाचा उच्चांक गाठत 'जीएसटी' सह चांदी प्रतिकिलो चार लाखांवर पोहोचली होती, तर सोने (प्रतिदहा ग्रॅम) एक लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचले होते. आतापर्यंतचा भावाचा हा ऐतिहासिक उच्चांक होता.मात्र, शुक्रवारी (ता. ३०) चांदीच्या भावात प्रतिकिलो ४२ हजारांची, तर सोन्यात नऊ हजारांची (प्रतिदहा ग्रॅम) घट झाली. आज सोन्याचा दर जीएसटीचा एक लाख 63 हजार तर चांदी तीन लाख पाच हजारावर आली आहे यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला.

लाडक्या बहिणींची पडताळणी खोळंबणार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा कामास स्पष्ट नकार

जळगाव राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही भागात अंगणवाडी सेविकांना घरोघर फिरून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणीच्या कामाला विरोध केला आहे. यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन व संघटनेतील तिढा निर्माण होऊन लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा प्रश्न मात्र रखडणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची सामाजिक कल्याण योजना असून, पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभदिला जात आहे. आता मात्र लाभार्थी महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र प्रक्रियेत त्रुटींमुळे व तांत्रिक कारणांमुळे केवायसी पूर्ण करू शकले नाही. ज्यामुळे त्यांच्या हप्ता अडखळला आहे. यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी करून हा गोंधळ दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्हाला काही अडचण नाही. काही तांत्रिक बाबी असतील म्हणून लवकर शपथविधी करत असतील. हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात देखील तो त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे महाजन म्हणाले.

माघ पौर्णिमा व शनिवार,रवीवारच्या सुट्यांमुळे तुळजाभवानी मंदीरातील व्हीआयपी दर्शन पास दोन दिवस राहणार बंद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी दर्शनासाठी मोठ्या संख्येने राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने तुळजापूरात येत असतात.शनिवार,रविवारी सुट्टी व माघ पोर्णिमा असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी या दोन पाचशे रुपयाचे सशुल्क देणगी दर्शन पास व दोनशे रुपयांचा सशुल्क देणगी दर्शन पास बंद ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.तर दोनशे रुपयांचा सशुल्क देणगी दर्शन पास चालु राहुन त्या भाविकांना प्रांगणातून अभिषेक हॉल मार्गे दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.

दागिने चोरणाऱ्या दोघींना भंडाऱ्यात नागरिकांनी पकडलं....दागिने चोरणाऱ्या दोघीही नागपूरच्या

ऑटोत बसून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून पळून जात असताना भंडाऱ्यात नागरिकांनी दोघींना पकडलं. त्यांना भंडारा पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर अंगझडती दरम्यान या महिलांकडे चोरलेले दागिने आढळून आले. ही घटना भंडाऱ्याच्या मोठा बाजार परिसरात घडली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी नागपूरच्या दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सारिका शेंडे (३०) आणि ज्योत्स्ना लोंढे (४२) असं दागिने चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोघींचं नाव आहे. या दोघीही नागपूरच्या कळमना मार्केट परिसरात राहतात.

रत्नागिरी नगरपरिषदेची पहीली सर्वसाधारण सभा गाजली

रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चार वर्षातील प्रशासकीय कामकाजाचे भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी अक्षरशः वाभाडे काढले. शौचालय दुरुस्तीवरील खर्च, कुत्रे निर्बीजीकरण आणि मोकाट गुर पकडण्यासाठी केलेला खर्च, कर्मचाऱ्यांच्या साहित्य खरेदीवर खर्च झालेले लाखो रुपये आणि महानगर गॅस कंपनीला दाखवण्यात आलेली मेहरबानी यावरून नगरसेवकांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः पळताभुई थोडी केली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारात झालेल्या कामावरून नगरसेवक आक्रमक झाले.स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छतागृह दुरुस्ती कामात मोठा घोळ घालण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी उपस्थित केला. याप्रकरणी बांधकाम अभियंत्यांवर चौकशी करून कारवाई करावी असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

जालना महानगरपालिकेत शिवसेना गटनेता म्हणून दीपक राठोड यांची निवड

जालना शहर महानगरपालिकेतील शिवसेना पक्षाच्या वतीने संघटनात्मक निर्णय घेण्यात आला. यात पक्षाच्या गटनेतेपदी दीपक राठोड यांची तर शिवसेना पक्षाच्या प्रतोदपदी दुर्गेश काठोटीवाले यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्तांसमोर ही प्रक्रिया पार पडली आहे. महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाने 12 जागांवरती विजय मिळवला आहे. प्रतोद आणि घटनेचा निवडीसाठी शिवसेनेचे 12 नगरसेवक विभागीय कार्यालयात हजर होते.

वाशिम जिल्ह्यात तुर खात आहे भाव.. कारंजा बाजार समितीत तुरीला 9 हजार रुपयांच्या वर मिळायला दर

वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सध्या तूर भाव खातीय... या बाजार समितीत तुरीला हमीभावापेक्षा वाढीव दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 9 हजार 60 रुपयांचा दर मिळाला आहे. तर या पाठोपाठ रिसोड बाजार समितीत तुरीला 9 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असून, वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 8 हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे. तुरीला मिळत असलेले भाव हे हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून,आवकही चांगल्या प्रमाणात होत आहे.

लोहगाव मध्ये कोयता गँग ने तरुणावर केले वार

लोहगाव येथील दादाची वस्ती समोरील आर्या इलेक्ट्रॉनिक मध्ये काम करणाऱ्या अनिल उर्फ मोन्या लक्ष्मण भोगिरे (रा. संतानगर) या तरुण युवकावर गुरुद्वारा मधील टोळक्याने जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्यानी वार केले आहेत. दुकानात काम करणाऱ्या अनिल वर अचानक हल्ला 4झाल्याने अनिल हा गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेहमी गजबजलेल्या दादाची वस्ती, आदर्श नगर कमान जवळील चौकात सायंकाळी साडेसात झालेल्या या घटनेमुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. लोहगाव पोलिस या गंभीर घटनेचा तपास करत आहेत.

सोलापूर महापालिकेतील भाजपचे सर्व नगरसवेक पुण्याकडे रवाना

विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक पुण्याकडे रवाना

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक निवडून आले आहेत

हे सर्व नगरसेवक आज गट नोंदणी करण्यासाठी पुण्याकडे रवाना झालेत

आज दुपारी भाजप गटाची नोंदणी विभागीय आयुक्ताकडे होईल

सोलापूर महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता असून गटनेता कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे

सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांचे नाव निश्चित होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल.राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी वहिनीचे अभिनंदन करेल एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आणि महाराष्ट्रावर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या सगळ्या गोष्टीला संमती दिली आहे.कार्यकर्त्यांना संभाळण्याची भूमिका एक मायेचा आधार कसा द्यावा ही भूमिका वहिनी घेतली त्याबद्दल मी वहिनीचे आभार मानतो. आमच्या सगळ्या भावना आपण ओळखल्या आमच्या अंतकरणातला टाहो आपण ओळखला दुःख बाजूला सारून माझा कार्यकर्ता माझे राष्ट्रवादी माझा महाराष्ट्र म्हणून जे मान्यता दिली त्याबद्दल मी अंतकरणापासून वहिनीचा आभारी आहे, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.

हदगाव मध्ये क्षुल्लक कारणावरून एकाचा खून

नांदेडच्या हदगाव शहरात क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आला. हदगाव शहरातील बागवान गल्ली येथे ही घटना घडली.46 वर्षीय शेख नयुम बागवान यांची हत्या करण्यात आली. चार ते पाच जणांनी त्यांची हत्या केली.आरोपी शेख आसिफ , शेख शोयब , शेख अरीख , शेख हसन , शेख युसूफ हे मयत नयुम बागवान यांच्या घरापुढे जोरजोरात बोलत थांबले होते .. त्यांना नयुम बागवान यांनी घरासमोरं जोरात का बोलत आहात असा जाब विचारला , त्यातून वाद होऊन आरोपींनी नयुम बागवान यांना मारहाण केली.त्यांच्या डोक्यात विटेने मारहाण करण्यात आली . यात त्यांचा मृत्यू झाला. हदगाव पोलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.

nashik-malegaon-मालेगाव महापालिकेत कॉंग्रेस-भाजपाचा एकत्रीत गट स्थापना

राजकारणात काहीही होऊ शकते,राज्यात व देशात एकमेकांचे कट्टर विरोधाक असलेले भाजपा-कॉंग्रेस मात्र मालेगाव महापालिकेत एकत्र येत त्यांन नाशिकच्या विभागीय कार्यालयात जात भारत विकास आघाडीची स्थापना केलीय.महापालिकेत काँग्रेस तीन व भाजपाचे दोन नगरसेवक निवडूण आले असून या गटाने ईस्लाम व समाजवादी च्या युतीला पाठिंबा दिला असून सध्या त्यांचे संख्यांबळ ४५ झाले आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा देण्यात यावी अशी राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी,तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे ही सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचेही आमदारांनी सांगितले.
- राजू कारेमोरे,आमदार राष्ट्रवादी

Maharashtra Live News Update: राज्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील आठवड्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण हार असल्याने तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोमवारपासून तर मराठवाड्यात मंगळवारपासून पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे

राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह किमान तापमानात काहीशी वाढ कायम राहण्याची शक्यता

राज्यात शनिवार ते रविवार दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता

पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (एमयुएचएस) ने केली सिंहगड दंत महाविद्यालयाची संलग्नता रद्द

या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ

आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय निकषांची पूर्तता न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट

हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०२६– २७ पासून लागू करण्‍यात येणार

अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई

हॉटेल मालक, मॅनेजरसह सात जणांवर गुन्हा दाखल

स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चौक येथील मोदी प्लाझा इमारतीत असलेल्या एलडिनेरो हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात असल्याचा पर्दाफाश

या कारवाईत हॉटेल मालक, मॅनेजर आणि कामगारांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर हॉटेलचे शटर आतून बंद असल्याचे आढळले. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला असता, हुक्का पॉट, चिलिम, प्रतिबंधित तंबाखुजन्य फ्लेवर आणि इतर साहित्य आढळून आले

मुंबईतून तिघांना अटक,शेंदूरसनी बनावट जन्मनोंदी प्रकरण

शेंदूरसनी ग्रामपंचायत मध्ये ऑनलाईन सत्तावीस हजार जन्म नोंदी केल्याचा प्रकार पुढे आला या पाठोपाठ उमरखेड तालुक्यातील भवानी इथेही असाच प्रकारे बनावट नोंदी केल्याचे आढळून आले या गुन्ह्याच्या तपासासाठी गठीत विशेष पथकाने बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पुणे- मुंबई इथून तब्बल 13 आरोपींना अटक केली शेवटच्या तीन आरोपींना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.

स्व.अजित पवारांना मालेगाव मध्ये सर्व पक्षीयांची श्रध्दांजली सभा

स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ मालेगावी सर्वपक्षीय शोक सभेच आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोठ्या संख्येने नागरिक,सर्व पक्षीय पदाधिकारी देखील उपस्थित होते. मंत्री दादा भुसे यांच्यासह मालेगाव मध्यचे माजी आमदार असिफ शेख यांनी देखील अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.त्यांच्या पक्षाच्या घड्याळ्याच्या चिन्हा प्रमाणे अजित दादा हे वेळेचे,शिस्तीचे भोक्ते होते त्यामुळे त्यांचा सर्वांना धाक होता,याची आठवण करुन देत मंत्री दादा भुसे यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा? पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

Hair Fall: केस गळतीवर घरीच करा 'हा' १ सोपा उपाय, १५ दिवसांत दिसेल फरक

Cancer: सकाळी उठल्यावर बेडशीट ओली दिसतेय? कॅन्सरचं असू शकतं लक्षण, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Herbal Tea : दुधाचा वापर न करता बनवा 'या' ५ प्रकारच्या हर्बल टी

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

SCROLL FOR NEXT