Ajit Pawar plane crash controversy. saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! अजित पवारांच्या निधाना दिवशीच गैरप्रकार, दुखवटा असताना प्रमाणपत्रांचे वाटप? राज्यात खळबळ

Ajit Pawar death : दिवंगत अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात गैरप्रकार झाल्याचा आरोप होत असून, अल्पसंख्याक विभागातून नियमबाह्यरीत्या डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वाद पेटला आहे.

Akshay Badve

Alleged certificate distribution during mourning holiday : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपगातात अकाली निधन झाले. अजित पवारांच्या निधनाचा संपूर्ण राज्याला धक्का बसला. या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीने त्याच दुपारी दुखवटा जाहीर केला होता. पण अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Youth Congress allegations on minority department)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधानानंतर तात्काळ राज्यात दुखवटा जाहीर केला होता. त्यावेळी शासकीय सुट्टी जाहीर झालेली होती. इकडे राज्यात दुखवटा असताना दुसरीकडे अल्पसंख्याक विकास विभागात मात्र एक वेगळाच प्रकार सुरू होता. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, दुखवटा आणि सुट्टीच्या दिवशी तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत या विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप सुरू होते, असा आरोप युवक काँग्रेस ने केला आहे.

नेमका आरोप काय आहे?

अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर राज्यभर शासकीय दुखवटा होता आणि कार्यालयांना सुट्टी होती. पण त्या दिवशी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वाटप केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी केला आहे. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. जैन यांच्या आरोपात किती तथ्य आहे? याचा तपास केला जाण्याची शक्यता आहे. पण राज्यात दुखवटा असताना असा गैरप्रकार झाल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे.

अजित पवारांच्या निधनादिवशीच मंत्रालयात गैरप्रकार?

अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अल्पसंख्याक विभागातून प्रमाणपत्रांचे वाटप करणारा "गॉडफादर कोण आहे? असा प्रश्न युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी उपस्थित केला आहे. आर्थिक हितसंबंधातून आणि पैशांच्या मोबदल्यात या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यरीत्या ही प्रमाणपत्रे दिले आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जैन यांच्या आरोपात तथ्य आढळले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का? असा सवाल काँग्रेसमधून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, काय झालं नेमकं?, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

O Romeo Collection : टीम इंडियाचा विजय शाहिद-तृप्तीला पडला महागात, नेमकं काय घडलं?

HCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार मिळणार ७०,०००; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Ishaan Kisan Girlfriend Aditi Hundia Networth: ईशान किशनची होणारी बायको अदिती हुंडियाची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT