Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

Nashik: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

नाशिक -

- नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

- भाजपच्या १६ महिला नगरसेविका महापौर पदासाठी पात्र

- मात्र पहिल्या दिवशी एकाही इच्छुकाने नेला नाही अर्ज

- नाशिक महापालिकेसाठी अंतिमतः ३ महिला नगरसेवकांमध्ये रस्सीखेच

- वरिष्ठ पातळीवरून होणार महापौर पदासाठी चेहऱ्याची निवड

Nashik: नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद, पीकअप लुटून जीवघेणे हल्ले

नाशिक -

- नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद

- पीकअप लुटून जीवघेणे हल्ले करत टोळक्याचा रात्रभर धुडगूस

- कुऱ्हाड, कोयते घेऊन ३ ठिकाणी सशस्त्र हल्ले

- अंबडमध्ये वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

- तर गंगापूर रोडवर चहाविक्रेत्यावर हल्ला करत दुकानाची तोडफोड, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

- घटनेनंतर पोलिसांकडून एका युवतीसह १० गुंडांना अटक

- टोळीविरोधात खून, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ला, शस्त्रे बाळगणे, संघटित गुन्हेगारी असे १२ पेक्षा जास्त गुन्हे आहेत दाखल

- पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत टोळीचा माफीनामा

Nagpur: नागपूर महानगर पालिकेच्या ओबीसी नगरसेवकांवर आरक्षण मर्यादा ओलांडल्याने अपात्रतेची टांगती तलवार

नागपूर -

- नागपूर महानगर पालिकेच्या ओबीसी नगरसेवकांवर आरक्षण मर्यादा ओलांडल्याने अपात्रतेची टांगती तलवार

- यातच खुल्या प्रवर्गात महापौर पद आल्याने तसव्वा सव्वा वर्षात विभागणी करून पहिली सव्वा वर्ष ओबीसी महिलेला तर दुसरी सव्वा वर्ष खुल्या प्रवर्गातील महिलेला देण्याबाबत भाजप मध्ये चर्चा सुरू

- महापौर पदाच्या निमित्याने भाजप सोशल इंजिनिअरिंग करणार

- या आधी देखील भाजपने नागपूर मनपा मध्ये सव्वा सव्वा वर्षात महापौर पदाची विभागणी केली होती.

- यंदा पण तोच फॉर्म्युला अमलात आणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना महापौर आणि उपमहापौर होण्याची संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न

- नागपूर मनपा मध्ये 151 पैकी 102 जागी युतीचे नगरसेवक निवडून आले आहेत...

Kolhapur: सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करा, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी

कोल्हापूर -

सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करा, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी

सीटीईटी परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्याने शिक्षकांची कोंडी

परीक्षा देणाऱ्या शिक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

कोल्हापुरातील परीक्षार्थ्यांना मुंबईऐवजी जवळचे केंद्र द्यावे – शिक्षक संघटना आक्रमक

Nagpur: नागपूर विमानतळावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ

नागपूर

- नागपूर विमानतळावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ

- २०२५ (जाने.–नोव्हें.) कालावधीत २६.८५ लाख प्रवाशांची नोंद

- २०२४ च्या तुलनेत सुमारे १.७३ लाखांनी वाढ

- उद्योग, खाण आणि पर्यटन क्षेत्रातील वाढीचा परिणाम

- दररोज सरासरी ९ हजारांहून अधिक प्रवासी ये-जा, सुमारे ६० उड्डाणे (आवागमन) नागपूरहून सुरू

- दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू मार्गांवर सर्वाधिक उड्डाणे, शारजाह आणि दोहा आंतरराष्ट्रीय सेवा उपलब्ध

- नोव्हेंबर महिन्यात २.८ लाखांहून अधिक प्रवासी

Nagpur: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र

नागपूर -

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात नागपूर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र

- राष्ट्रवादी दादा गटाच्या कार्यालयात पार पडली श्रद्धांजली सभा

- “मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाही”

- नागपूरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची भावना

- राष्ट्रवादी दादा गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, आणि पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र

Nagpur: समृद्धी महामार्गावर ‘एचटीएमएस’ प्रणाली बसविण्याचे काम सुरू

नागपुर -

- समृद्धी महामार्गावर ‘एचटीएमएस’ प्रणाली बसविण्याचे काम सुरू

- एमएसआरडीसीकडून ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान गँट्री उभारणी

- कामासाठी महामार्ग टप्प्याटप्प्याने तात्पुरती बंद ठेवली जाणार आहे...

- प्रत्येक टप्प्यात ४५ ते ६० मिनिटे वाहतूक पूर्णतः थांबवली जाईल

- नागपूर, हिंगणा, वर्धा, सेलू, आर्वी तालुका हद्दीत काम

- एचटीएमएस अंतर्गत ANPR कॅमेरे, वेगमापक, VMS बोर्ड बसविणार

- वाहतूक उल्लंघन नियंत्रण आणि रिअल-टाइम ट्राफिक मॉनिटरिंगसाठी प्रणाली उपयोगी

Nagpur: नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत अनेक पक्षांची गट नोंदणी प्रलंबित

नागपूर

- नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेत अनेक पक्षांची गट नोंदणी प्रलंबित

- आज गट नोंदणी प्रक्रिया न होणाची शक्यता...

- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी अभ्यास दौऱ्यावर, प्रभार दिलेला नाही.

- आयुक्त आणि जिल्हाधिकारी बाहेर असल्याने प्रक्रिया ठप्प.

- नागपुरात भाजपचा गटनेता अद्याप निश्चित नाही.

- काँग्रेस, मुस्लिम लीग, एमआयएमची नोंदणी पूर्ण.

- चंद्रपूरमध्ये काँग्रेस - भाजपची नोंदणी बाकी.

Ahilyanagar: सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष करून उपमुख्यमंत्री करावे, अहिल्यानगरच्या NCP जिल्हाध्यक्षांची मागणी

अहिल्यानगर -

राजकारणाच्या पटलावर अजितदादांचे नाव ठेवायचे असेल तर सुनेत्रा पवार यांना पक्षाचे अध्यक्ष करून उपमुख्यमंत्री करावे

अहिल्यानगरचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र

पक्ष एक संघ ठेवण्यासाठी लाखो कार्यकर्त्यांच्या भावना

सुमित्रा पवारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून विधिमंडळ पक्षप्रमुख करावे अशोक सावंत यांची मागणी

Yavatmal: वाळू वाटपाचा दर महिन्याला अहवाल सादर करा

यवतमाळ -

वाळू वाटपाचा दर महिन्याला अहवाल सादर करा

ग्रामपंचायत क्षेत्रातील एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या वाळू घाटातून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाला मंजुरी देण्यात आलीये

तसेच वाळू वाटपाचा अहवाल दर महिन्याला सादर करावा असे आदेश यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होणार आहे.

Nashik: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

नाशिक -

- शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेते पदी अजय बोरस्ते यांची निवड

- नाशिक महापालिकेच्या गटनेते पदी शिंदेंच्या शिवसेनेकडून अजय बोरस्ते यांची निवड

- नाशिक महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे २६ नगरसेवक

- भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हायचे की विरोधात बसायचे याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती

Ratnagiri: रत्नागिरीमध्ये सततच्या वातावणीय बदलाचा फटका मच्छिमारांना

रत्नागिरी -  सततच्या वातावणीय बदलाचा फटका मच्छिमारांना

मच्छिमारांना जाळ्याच मच्छीच सापडेला

 पौर्णिमेच्या चांदण्यामुळे मासळी झाली होता  स्थलांतरित 

तर आता गेले काही दिवस समुद्रात जोरदार वारे वाहत असल्याने पुन्हा मच्छीमार अडचणीत

मासे मिळत नसलेल्याने मच्छीमारांना सोसावे लागतेय आर्थिक नुकसान 

 मासेमारी आणि त्यावर अवलंबून असणारे अनेक जोडधंदे देखील संकटाच्या जाळ्यात 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

Stroke risk reduction: छोटी चूक ठरू शकते जीवघेणी! तुमच्या 'या' 5 सवयी टाळू शकतात स्ट्रोकचा धोका

Marathi Movie: शिवरायांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेचा इतिहास रुपेरी पडद्यावर; रणपति शिवराय या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Mumbai News: ठाकरे बंधूबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे-ठाकरेसेनेचे कार्यकर्त्यांकडून तरुणाला अर्धनग्न करत मारहाण; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'मुळे राज्याच्या महसूलीत तूट; आर्थिक सर्व्हेक्षणात महाराष्ट्रावर ताशेरे

SCROLL FOR NEXT