Ajit Pawar Saam Tv News
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'तुम्हाला जमत नसेल तर पद सोडा', पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरून अजित पवार कडाडले

Ajit Pawar on Pune Police: पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पुणे पोलिसांच्या कामावर तीव्र नापसंती दर्शवलीय. माध्यामांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Bhagyashree Kamble

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पुणे पोलिसांच्या कामावर तीव्र नापसंती दर्शवलीय. शरद मोहोळ प्रकरण असो किंवा शुभदा कोदारे या तरूणीवर भररस्त्यात धारदार शस्त्राने केलेला हल्ला. या प्रकरणांमुळे पुण्यातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीवर माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम जमत नसेल तर, त्यांनी काम सोडावे, अशा शब्दात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यात महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, वाढत्या गुन्हेगारांबाबत पोलीस आयुक्तांशी बोलणार आहे. स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेतलीय. राजकीय हस्तक्षेप नसला तर, पोलिासांना काम करणं अवघड जात नाही. आम्ही कुणालाही हस्तक्षेप करून देत नाही. गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस कमी पडत आहेत. असं पोलिसांच्या कामगिरीवर अजित पवार म्हणाले.

कोयता गँग, टोळ्या, महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्न, या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या प्रश्नाला उत्तर देताना, अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. पुण्यात अजिबात राजकीय हस्तक्षेप होत नाही. पोलिसांची गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी आहे. पोलीस कमी पडत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना जमत नसेल तर, त्यांनी काम सोडावे आम्ही दुसरे अधिकारी आणू, असं अजित पवार म्हणाले.

'जबाबदारी आमची आहे. जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला आहे. त्याला तडा जाणार नाही याची खबरदारी घेऊ. गुन्हेगारी कशामुळे वाढत आहे, यासंदर्भात ही चर्चा करू.' असं अजित पवार म्हणाले. पीएमपीच्या ताफ्यात टाटाच्या २०० नवीन बस निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. माध्यमांशी बोलण्यासाठी मी बैठका थांबवून आलो, मी परत जाईन आणि पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT