Maharashtra Politics 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपसोबतच्या घरोब्यावर अजित पवार यांचा दावा, राष्ट्रवादीतील फुटीवरून पुन्हा संभ्रम?

Girish Nikam

अजित पवारांचे एक-एक शिलेदार साथ सोडून शरद पवारांकडे जात आहेत. या पार्श्वभूमिवर अजित पवारांचे भाष्य चर्चेत आलंय. शरद पवारांना विचारुनच राजकीय भूमिका घेतल्याचा पुनरुच्चार दादांनी केलाय. पाहूया एक रिपोर्ट.

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात. राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती असो वा मविआ सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्यावर बैठकांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये इन कमिंग-आऊट गोईंग सुरु आहे. सर्वाधिक फटका अजित पवारांच्या पक्षाला बसतोय. दादांचे एक-एक शिलेदार पवारांच्या दाराशी जात असतानाच बारामतीमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान दादांनी भाजप बरोबरच्या युतीबाबत वक्तव्य केलंय. ‘शरद पवार यांना सांगूनच मी माझी राजकीय भूमिका घेतली होती’, असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य करणं टाळलंय. लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती,असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला. गडचिरोलीच्या अहेरीत धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.

यावेळी अजितदादांनी कुटुंब एकसंघ ठेवण्यावर भाष्य करत चूक भूल करू नका, बापासोबत रहा.. अशा शब्दात साद घातली होती. मात्र आता पुन्हा एकदा अजितदादांनी पवारांना विचारूनच फुटल्याचा दावा केल्यामुळे पुन्हा संभ्रमाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. दादांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी या विधानाबाबत साधलेल्या टायमिंगचा त्यांच्या पक्षाला किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : वास्तुशांतीसाठी जवान रजा घेऊन आला, वडिलांच्या मदतीला गेले अन् काळाने घाला घातला

Ratan Tata Passed Away : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलं रतन टाटांच अंत्यदर्शन

Viral Video: पाकिस्तानमध्ये'मिनी इंडिया'! कराचीमधील नवरात्री उत्सवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

Maharashtra Politics : नगरचं राजकारण पुन्हा तापले, विखेंचा लंकेंवर हल्लाबोल; म्हणाले पराभवाने मी खचलो नाही

Health Tips: रिकाम्या पोटी दुधासोबत 'या' फळाचे सेवन करणे फायदेशीर

SCROLL FOR NEXT