Ajit Pawar Chhatrapati Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar Chhatrapati Sambhajinagar: अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, मराठा समाजाचा विरोध नाहीतर 'हे' कारण आलं समोर

Ajit Pawar Chhatrapati Sambhajinagar Tour Cancelled: संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. याचे उद्घाटन आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार होते. मात्र दौरा रद्द झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातच असणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राजकीय नेत्यांना विविध ठिकाणी विरोध केला जातोय. अजित पवारांच्या (Ajit Pawar) आजच्या दौऱ्याला देखील काही मराठा आंदोलकांनी विरोध केला. विरोध करत असलेल्या गंगापूर तालुक्यातील दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. याचे उद्घाटन आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र या संमेलनाला अजित पवारांनी येऊनये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केलं होतं.

एकंदर परिस्थितीमुळे गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यत घेतलं. मात्र, नंतर अजित पवारांचा दौरा हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

SCROLL FOR NEXT