Ajit Pawar Banner  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Banner In Dharashiv: उपमुख्यमंत्री झाल्यानंतर दादांच्या सासरवाडीत झळकले बॅनर, अजित पवारांसोबत शरद पवारांचाही फोटो

Deputy CM Ajit Pawar: अजित पवार यांनी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

Priya More

बालाजी सुरवसे, धाराशीव

Dharashiv News: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. याचे केंद्रबिंदू ठरलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar). अजित पवार यांनी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला.

शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार उमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि निकटवर्तीय आमदारांचा प्रचंड आनंद झाला. अजित पवार यांच्या सासुरवाडीतील लोकांना देखील खूप आनंद झाला आहे. धाराशिवमध्ये अजित पवार यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत.

राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांचे धाराशिव शहरात अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तेरगाव हे अजित पवारांची सासरवाडी असून माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील हे त्यांचे मेहुणे आहेत. धाराशिव जिल्ह्यावर अजित पवारांचे पहिल्यापासूनच वर्चस्व राहिले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मागे उभा राहतील,असा अंदाज बांधण्यात आला होता.

मात्र आतापर्यंत जिल्ह्यात कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्याने उघडपणे अजित पवारांसोबत की शरद पवारांसोबत याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच आता धाराशिव शहरात अजित पवार यांचे अभिनंदन करणारे पोस्टर झळकले आहेत. अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. हे बॅनर कोणत्या नेत्यांनी लावले आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात चर्चा होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar Wedding: 'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार अडकली लग्नबंधनात! थाटामाटात पार पडला विवाहसोहळा, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पाऊस, कांद्याचं झालं नुकसान

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

SCROLL FOR NEXT