Raj Thackeray On Alliance: उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला का? राज ठाकरे स्पष्टच बोलले...

Raj Thackeray And Uddhav Thackeray: मनसे नेते अभिजीत पानसे आणि संजय राउत यांच्या युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Raj Thackrey
Raj Thackreysaam tv
Published On

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे.

दरम्यान मनसे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळतेय. मनसे नेते अभिजीत पानसे आणि संजय राउत यांच्या युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राऊत आणि पानसे यांनी एकत्र एका गाडीतून प्रवास केला आणि या प्रवासादरम्यान त्यांच्यात युतीबाबत चर्चा झाली असे सूत्रांनी सांगितले आहे.

Raj Thackrey
Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting: शरद पवारांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही, अजित पवार गटाचा मोठा दावा

या भेटीनंतर अभिजीत पानसे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली, तर संजय राऊत यांनी देखील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे याच्याशी खलबतं केली. त्यामुळे या चर्चेला दुजोरा मिळला.

मात्र मनसे नेते अभिजीत पानसे यांनी राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. युतीचा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही असे पानसे म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'युतीसाठी मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही' असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. (Tajya Marathi Batmya)

Raj Thackrey
Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाला मिळणार? कायदा काय सांगतो?; कायदेतज्ज्ञांचे मत

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राच्या विकासाठी आता दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे अश आशयाचे बॅनर्स काही दिवसांपूर्वी मातोश्रीबाहेर लागले होते. (Latest Political News)

त्यानतंर ठाण्यात आणि पुण्यात देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करणारे बॅनर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले. कार्यकर्त्यांच्या या मागणीच्या जोरामुळे आणि पानसे-राऊत भेटीमुळे हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com