ajit pawar, bondharwadi dam, shashikant shinde, shivendrasinhraje bhosale.
ajit pawar, bondharwadi dam, shashikant shinde, shivendrasinhraje bhosale. saam tv
महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत बोंडारवाडी धरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वपुर्ण निर्णय

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : सातारा (satara) जिल्ह्यातील जावळी (jawali) तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण (bondharwadi dam) बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज (बुधवार) येथे नमूद केले. (bondharwadi dam latest marathi news)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil), पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil), आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde), आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendrasinhraje bhosale), श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर (bharat patankar) आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित आहे. जावळी तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे हे धरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे असा सूर आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत आवळला. डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक असल्याचे नमूद केले.

यावर धरणाच्या पुर्ततेसाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने आवश्यक कार्यवाही करावी. धरणासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. सर्व्हेक्षण साठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने धरणाचे सर्व्हेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केल्या.

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभाग प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, विशेष कार्यकारी अधिकारी सी. आर. गजभिये आदी उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत माहिती दिली. त्यांनी धरण प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आणि भविष्यात करावयाच्या कामाबाबत माहिती दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT