Ajit Pawar Latest News  SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar News: बाळासाहेबांच्या विचाराने चालताय मग...अजित पवारांचा CM शिंदेंना रोखठोक सवाल

औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती दिल्याच्या वृत्तानंतर अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.

ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही

मोबिन खान

अकोले/अहमदनगर: औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. या निर्णयाला राज्यातील नवनिर्वाचित एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी या सरकारवर टीकेची झोड उठवली असतानाच, विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही टीकास्त्र सोडलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का दिली, असा थेट सवाल पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. (Ajit Pawar-Eknath Shinde Latets News in Marathi)

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं होतं, माझं सरकार आल्यावर मी औरंगाबादचं (Aurangabad) संभाजीनगर नामकरण करेल, मग आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का दिली, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. अकोले येथे आज अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी पवार आले होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मतभेद आहेत का? यावर पवार म्हणाले, की यापूर्वीही शिवसेनेने यूपीएच्या प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना (Shivsena) हा त्यांचा स्वतंत्र पक्ष असून, मातोश्रीचा निर्णय आहे.

राज्याला इतके दिवस मंत्रिमंडळापासून पूर्ण बहुमत असताना वंचित ठेवणे बरोबर नाही. लवकर मंत्रिमंडळ नेमण्यात येत नाही. पालकमंत्री नेमले गेले नाहीत. उद्या मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होतच असतात. मतमतांतरे असतात, म्हणजे आम्ही एकमेकांचे दुश्मन नसतो. आपल्या महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे, असेही पवार म्हणाले. राज ठाकरेंचं मागील कालावधीत ऑपरेशन झालं. म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले असावेत, असे भाष्य अजित पवार यांनी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत केलं.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT