Ajit Pawar News Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar News: बेळगावात मराठी नेत्यांची धरपकड केल्याने अजित पवार संतप्त; म्हणाले, "शिंदे, फडणवीस गृहमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीला होते, मग…"

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजीत मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar News: सिमावादावरून राजकारण मोठ्या प्रमाणावर तापलं आहे. यावर काही दिवसांपूर्वी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यावेळी कोणीही कुणाची अडवणूक न करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजीत मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. तसेच काही नेत्यांची धरपकड करण्यात आली. या सर्व प्रकारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, "काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी कोणीही एकमेकांच्या राज्यात जाण्यास अडवणूक करू नये, असं ठरलं. तरीही लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येऊ नये म्हणून सांगितलं. तसेच बेळगावात धरपकड सुरु झाली आहे."

"गृहमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. मात्र, गृहमंत्र्यासमोर ठरवलेल्या गोष्टी कोण मोडत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला हवं. तसेच त्याच्या पुढे काय कारवाई केली जाणार आहे, हे देखील समजलं पाहिजे," असं अजित पवारांनी म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका

पुढे या विषयी अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले की, "महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर समंजस्याची भूमिका घेऊ असं सांगायाचं आणि वेगळं वागायचं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागणार. मात्र, बेळगावात मराठी लोकांची धरपकडं सुरु करून . तिथल्या मुख्यमंत्र्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे." असे म्हणत अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

पुण्यात गुन्हेगारांना तिकिट देणं आवडलं नाही, फडणवीसांनी अजित पवारांना सुनावले

SCROLL FOR NEXT