Ajit Pawar Vs Nana Patole
Ajit Pawar Vs Nana Patole Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Vs Nana Patole : राजीनाम्यावरून अजित पवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली, मविआमध्ये विसंवाद वाढतोय का?

Satish Kengar

Ajit Pawar Vs Nana Patole : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये विसंवाद वाढतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामागचं कारण ही तसेच आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली होती.

याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ते म्हणाले होते की, याबाबत त्यांचे प्रवक्ते बोलतील. यातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नवीन शाब्दिक वाद समोर आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला असून अजित पवार खोटं बोलत आहेत, असं ते म्हणाले आहेत.  (Breaking Marathi News)

'Ajit Pawar On Nana Patole : पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला'

राष्ट्रवादी नेते अजित पवार म्हणाले होते की, ''आमचे त्यावेळचे (महाविकास आघाडी सरकारच्या काळातील) विधानसभा अध्यक्ष यांनी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरच त्यांना सांगितलं.''

ते म्हणाले, ''एकतर तो द्यायला नको होता. तो राजीनामा दिल्यावर लगेच विधानसभा अध्याक्षांची निवडणूक लावून तो विषय संपवला पाहिजे होता. मी कोणाला दोष देत नाहीये. पण दुर्दैवानं आमच्या सगळ्यांकडून, महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने धसास लागला असता तर विधानसभेचे अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्या अधिपत्याखाली या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Kelkar: तुझ ते लाजण अन् लाजून नाजूक हसणं...

Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

Bomb Threat Mailed To Nagpur Airport: नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; पोलिसांकडून मॉक ड्रिल

IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

SCROLL FOR NEXT