Investigators examine aircraft debris as black box data recovery begins to uncover the cause of the crash. Saam Tv
महाराष्ट्र

दादांच्या विमान अपघाताचं गूढ उलगडणार? ब्लॅक बॉक्स सांगणार विमान पडलं की पाडलं?

Black Box Analysis Ajit Pawar Aircraft Crash: आता अजित पवारांच्या विमानाचा अपघात होता की घात... याचं गूढ उलडण्याचा मार्ग मोकळा झालाय...कारण विमानातील ब्लॅक बॉक्स सापडलाय.. या ब्लॅक बॉक्समधून कोणतं सत्य उलगडणार आहे...

Bharat Mohalkar

याच भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला. आता या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरी सुरु कऱण्यात आलीय.. त्यासाठी तीन टप्प्यात तपासणी करण्यात येणार आहे... आणि या ब्लॅक बॉक्समधूनच समोर येईल की विमान पडलं की पाडलं...

अपघाताच्या ठिकाणचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन ब्लॅक बॉक्समधील डेटा तीन पातळ्यावर रिकव्हर करण्यास सुरुवात कऱण्यात आलीय.. मात्र विमानात असतो तो ब्लॅक बॉक्स काही काळ्या रंगाचा नसतो.. तो भगव्या रंगाचा असतो... एवढंच नाही तर कितीही भयंकर स्फोट झाला तरी ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो... याच ब्लॅक बॉक्सचं तीन पातळ्यावर विश्लेषण होतं.. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचं तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषण या तांत्रिक बाबींचं विश्लेषण होणार.

तर दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचं विश्लेषण केलं जाणार... एवढंच नाही तर विमानाची चेकलिस्ट पाळली होती का? या डेटाचं कॉकपिट रेकॉर्ड तपासलं जाणार तर तिसऱ्या पातळीमध्ये अलार्म वेळेवर वाजला का? सेफ्टी सिस्टीमने योग्य इशारा दिला होता का? सेन्सरने चुकीचा डेटा दिला का? याची तपासणी केली जाणार.... त्यानंतर हा अहवाल डीजीसीएला दिला जाणार.. आणि एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (AAIB) कडून विमान अपघाताच्या तपासाला गती येणार...

आता ब्लॅक बॉक्समधील डेटा रिकव्हरी आणि विश्लेषणाला सुरुवात झाली असली तरी सरकारी अहवाल हे सरकारधार्जिणे असतात, असा दावा माजी अधिकारी विजय पांढरेंनी केलाय.. अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या... दादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचीही चर्चा रंगली.. मात्र आता ब्लॅक बॉक्स सगळ्या शंका दूर करुन दादांच्या विमान अपघाताचं गूढ उलगडणार आहे... आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या मनातील शंका दूर होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

SCROLL FOR NEXT