Debate intensifies after reports claim the aircraft’s black box recorders were damaged in the crash involving Ajit Dada Saam Tv
महाराष्ट्र

ब्लॅक बॉक्सचं काळंबेरं, दोन्ही रेकॉर्डर जळाले? 'दाल में कुछ तो काला है' ब्लॅक बॉक्स कसा जळाला?

Ajit Dada Crash: अजितदादांच्या विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी एकच राळ उठवलीय... विमान अपघातावेळचा महत्त्वाचा पुरावा असणारा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलाय... त्यामुळे दादांच्या विमान अपघातावरून कसं राजकारण तापलयं...

Suprim Maskar

अजितदादांच्या अपघाताचं गूढ सोडवण्यासाठी राज्याच्या नजरा खिळल्या होत्या त्या विमानातील 'ब्लॅक बॉक्स'कडे... मात्र आता याचं ब्लॅक बॉक्समधील दोन्ही रेकॉर्डर जळून खाक झाल्याची माहिती एएआईबीकडून देण्यात आल्यानं एकच खळबळ माजलीय.. विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळू शकतो? असा सवाल अमोल मिटकरींनी विचारलाय...

ब्लॅक बॉक्स कसा जळाला?

विमानाचा ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या टेलमध्ये, म्हणजे मागच्या भागात असतो. विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो... विमानात अपघातानंतर लागलेली आग 1,100°C पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक विशेषतः फ्लॅश मेमरी उष्णतेमुळे खराब होऊ शकते..किंबहुना 3 हजार 400 Gs पेक्षा जास्त धक्का बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते...मात्र दादांच्या विमानाची टेल पूर्णपणे सुस्थितीत आहे... त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. मग अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?

एकीकडे ट्विट करून मिटकरींनी प्रश्न उपस्थित केला असताना रोहित पवारांनीही पुन्हा ब्लॅक ब़ॉक्सवरून संशय व्यक्त केलाय... तर ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही, असा दावा काँग्रेसनं केलाय...

कुठल्याही विमान अपघातानंतर विमानातील ब्लॅक बॉक्स हा महत्त्वाचा पुरावा असतो.

भगव्या रंगाचा ब्लॅक बॉक्स कितीही तीव्रतेचा स्फोट झाला तरी सुरक्षित राहतो... पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचं तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषण या तांत्रिक बाबींची माहिती मिळते.तर दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचं विश्लेषण केलं जातं...एवढंच नाही तर विमानाची चेकलिस्ट पाळली होती का? तसचं या डेटाचं कॉकपिट रेकॉर्डसंदर्भातील माहिती मिळते...... तर तिसऱ्या टप्प्यात अलार्म वेळेवर वाजला का? सेफ्टी सिस्टीमने योग्य इशारा दिला होता का? सेन्सरने चुकीचा डेटा दिला का? याची माहिती मिळते..

दुसरीकडे विजय वडेट्टीवारांनी दाल में कुछ काला है, असं म्हणत अपघाताचं गूढ आणखी वाढवलयं... दरम्यान विमानाच्या टेलमध्ये ठेवलेला ब्लॅक बॉक्स जळू शकतो का? त्यात तांत्रिक बिघाड होऊ शकतो का? अजितदादांच्या विमानात नेमकं काय घडलं? तो अपघात होता की घातपात? या सर्व प्रश्नांची उत्तरं खरतर ब्लॅक बॉक्समध्ये दडलीय..मात्र त्याचवेळी ब्लॅक बॉक्स जळल्याची माहिती दादांच्या निधनाला तब्बल 20 दिवसानंतर उलटल्यावर समोर येत असेल तर...एकूणच अपघाताचं गुढ अधिक वाढलय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

LPG Crisis : 'गॅस' भडका शमवण्यासाठी ओतणार 'रॉकेल'; टंचाईवर काढला तोडगा, सरकारनं घेतले २ महत्वाचे निर्णय

मुंबईत 12 मार्च 1993 ची पुनरावृत्तीचा डाव? मुंबईत साखळी बॉम्बस्फोटांची धमकी?

SCROLL FOR NEXT