Thousands gather in Baramati with tearful eyes to bid a final farewell to Ajit Pawar, the people’s beloved ‘Dada’. Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Ajit Pawar Funeral : महाराष्ट्र पोरका! जनसामान्यांचे 'दादा' अनंतात विलीन; बारामतीत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप

Ajit Pawar funeral Baramati Live Update : महाराष्ट्र राजकारणातील धगधगते नेतृत्व अजित पवार अनंतात विलीन झालं. बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. विमान अपघातातील या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar funeral held with full state honours in Baramati : राज्याच्या राजकारणातील एक धगधगता आणि कृतिशील नेतृत्व असलेला तारा निखळला. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar last rites) यांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Ajit Pawar state honours) करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती जवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते. अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा (Baramati mourning) पसरली. कार्यकर्ते अन् नेत्यांच्या डोळ्यातून अश्रुंचा बांध फुटला होता.

महाराष्ट्र राजकारणातील एका पर्वाचा असा दुर्दैवी आणि अकाली अंत होईल, अशी पुसटशी कल्पनाही कुणी केली नव्हती. 'दादा' शब्दाचा खरा अर्थ ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केला, ते जनसामान्यांचे नेते अजित पवार आज अनंतात विलीन झाले. बारामतीच्या ज्या मातीने त्यांना घडवलं, त्याच मातीत आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

एक पर्व संपले!

'दादा गेले' ही भावना आजही अनेकांना पचनी पडत नाहीये. बारामती अन् महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने पोरका झाला. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जन समुदाय बारामतीकडे लोटला. लाडक्या दादांना निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. आपल्या लाडक्या दादाला शेवटचं पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. वृद्ध असो वा तरुण, महिला प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. अजित पवार अमर रहे... दादा परत या.. असा नेता पुन्हा होणे नाही...एक पर्व संपले, अशा भावना उपस्थित लोकांच्या होत्या.

अखेरचा निरोप -

देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितीन गडकरी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राहुल नार्वेकर, रितेश देशमुख, सुनील तटकरे, झिशान सिद्दीकी, अमोल मिटकरी, सुशिलकुमार शिंदे, आदिती तटकरे, प्रफुल्ल पटेल, गिरीश महाजन, जयकुमार गोरे यांच्यासह राज्यातील अनेक नेते अन् कार्यकर्ते दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

Mumbai Helipad : कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड सुरु होणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

Ajit Pawar Funeral: सुनेत्रा वहिनींना हात देत सुप्रिया सुळेंनी सावरलं, अजितदादांना अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT